Advertisement

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

गडचिरोलीतील ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार निवडून आले आहेत. वडेट्टीवार हे आक्रमक नेते मानले जातात. लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता संपली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. 


आक्रमक नेते

गडचिरोलीतील ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार निवडून आले आहेत. वडेट्टीवार हे आक्रमक नेते मानले जातात. लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक नावांची चर्चा होती. सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसार पक्षाने त्यांना गटनेता केले. त्यानंतर सोमवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 


निलम गो-हे उपसभापतीपदी?

शिवसेनेच्या निलम गो-हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.  उपसभापतीपदावरील दावा काँग्रेसनं सोडला आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत कुणाचाही अर्ज न आल्यास निलम गो-हे यांनी बिनविरोध निवड निश्चित आहे. 



हेही वाचा -

शिवसेना-भाजप आमदारांची मुंबईत संयुक्त बैठक




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा