Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

शिवसेना-भाजप आमदारांची मुंबईत संयुक्त बैठक

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता दोन्ही पक्षातील नेत्यांचा मनोमीलन व्हावं यासाठी भाजप-शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक विधानभवनात सोमवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना-भाजप आमदारांची मुंबईत संयुक्त बैठक
SHARES

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशांनंतर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत, मुख्यमंत्री सेनचा की भाजपचा यावरून दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे विधान करत असल्याने, दोन्ही पक्षातील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळं दोन्ही पक्षातील नेत्यांचा मनोमीलन व्हावे यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

५ वाजता बैठक

विधानभवनात सोमवारी संध्याकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या साडे चार वर्षात निर्माण झालेले मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार आहे.

युतीचं सरकार

राज्यात लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या यशाप्रमाणं विधानसभेत देखील युतीचं सरकार येण्यासाठी दोन्ही पक्ष नेत प्रयत्नात आहेत. त्यांची एकमेकांविरोधातील असलेली नाराजी दूर करणं महत्वाचं आहे. तसंच, विद्यमान विधानसभेतील अखेरच्या अधिवेशनात युतीच्या सर्व आमदारांचे मनोमिलन होण्याची आशा प्रमुख नेत्यांना आहे. त्यामुळं युतीच्या आमदारांची संयुक्त बैठक ही महत्त्वाची ठरणार आहे.हेही वाचा -

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार ४०० शिवशाही एसी बसेस

लोकलच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्यांकडून ५४ लाखांचा दंड वसूलसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा