Advertisement

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार ४०० शिवशाही एसी बसेस

शिवशाही बसला प्रवाशांचा मिळणार प्रतिसाह पाहता प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळानं ताफ्यात ४०० एसी बसेस सामील करण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार ४०० शिवशाही एसी बसेस
SHARES

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवशाही बसला प्रवाशांचा मिळणार प्रतिसाह पाहता प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळानं ताफ्यात ४०० एसी बसेस सामील करण्यात येणार आहेत. तसंच, २०० स्लीपर कोच ताफ्यात सामील करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

अत्याधुनिक सुविधा 

एसटी महामंडळ प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करत आहेत. तसंच, अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी २०१७-१८ पासून महामंडळानं ५०० एसी शिवशाही बसेस ताफ्यात सामील केल्या आहेत. २०१९-२०या वर्षात ४०० एसी शिवशाही बसेस त्याचप्रमाणं विना-वातानुकूलित आणि शयनप्रकारच्या अनुक्रमे २०० व ७०० नवीन बस आणण्याची योजना आखली असून, ४०० एसी शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती रावते यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

बसचं निश्चित ठिकाण

प्रवाशांना एसटी बसचं निश्चित ठिकाण समजण्यासाठी व्हेईकल ट्रकिंग सिस्टीम (व्हीटीएस) ही यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. २५० आगारे व ३३६ बसस्थानकांवर संगणकीकृत व २६८ अधिकृत खासगी एजंटद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अतिसंवेदनशील बसस्थानकांवर ३२३ सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आले आहेत.



हेही वाचा -

लोकलच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्यांकडून ५४ लाखांचा दंड वसूल

नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा