लोकलच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्यांकडून ५४ लाखांचा दंड वसूल

लोकलमधील वाढत्या गर्दीत महिला आणि दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्या प्रवाशांवर देखील पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

SHARE

पश्चिम रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात सुरूवात करण्यात आली आहे. अशातच आता, लोकलमधील वाढत्या गर्दीत महिला आणि दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्या प्रवाशांवर देखील पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. महिन्यांत तब्बल २४ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईदरम्यान, प्रवाशांकडून ५४ लाख रुपयांहून अधिक दंड वसुल करण्यात आला आहे.

विशेष पथकाची नियुक्ती

महिलांच्या डब्यांत पुरुष तर, दिव्यांगांच्या डब्यात अनेक प्रवासी घुसखोरी करीत असल्याच्या तक्रारी हेल्पलाइन, ट्विटरवरून आरपीएफकडं नेहमीच करण्यात येतात. त्यामुळं या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहेत. या पथकानं महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर आणि दिव्यांगांसाठीच्या राखीव डब्यात घुसखोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

प्रवाशांवर कारवाई

जानेवारी ते १३ जून या कालावधीत महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ६ हजार ०२० पुरुष प्रवाशांवर कारवाई करम्यात आली.तंसच, या कारवाईतून १२ लाख ६१ हजार ९५० रुपयांचा दंड वसून केला आहे. तर, दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या १८ हजार ०२१ प्रवाशांकडून ४१ लाख ४३ हजार ७३० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.हेही वाचा -

नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा

मध्ये रेल्वेच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलनसंबंधित विषय
ताज्या बातम्या