Advertisement

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांनी मुंबईबाहेर जाऊ नये, मुंबई महापालिकेच्या सूचना

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाचा उद्रेक कधीही होऊ शकतो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांनी मुंबईबाहेर जाऊ नये, मुंबई महापालिकेच्या सूचना
SHARES

मुंबईतील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गावी जाण्याचा प्लॅन केला असेल. मात्र, त्यांना आता मुंबईबाहेर पडता येणार नाही. तशा सूचनाच मुंबई महापालिकेने दिल्या आहेत. 

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणाच्या कामासाठी शिक्षकांची गरज भासून शकते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई सोडून बाहेर जाऊ नये, अशा सूचना पालिका प्रशासनानं दिल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शिक्षकांवर कोरोनाबाबतच्या कामांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी शिक्षकांकडं नियंत्रण कक्षात काम करणे आणि अन्न वितरणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचं महत्त्वाचं काम सोपवलं होतं. त्यामुळे आता पुन्हा गरज पडली, तर शिक्षक उपलब्ध असावेत, यासाठी मुंबई महापालिकेनं शिक्षकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नका, अशा सूचना केल्या आहेत.

  


हेही वाचा -

कोरोना रुग्णांसाठी मालाडमध्ये २२०० खाटांचं कोरोना केंद्र

टाटा समुहाकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, 'असं' करतं काम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा