Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका सज्ज


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका सज्ज
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं अनुयायी दादर येथील चैत्यभूमी इथं येतात. राज्याच्या अनेक भागातून हे अनुयायी येत असल्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेकडून दरवर्षी विविध सुविधा पुरविण्यात येतात. त्यानुसार यंदाही महापालिकेनं तयारी दर्शवली आहे.

चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्थानक, राजगृह(हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (वडाळा), लोकमान्य टिळक टर्मिनर्स याठिकाणी आंबेडकर अनुयायींसाठी राहण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, मोबाइल टॉयलेट यांसारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 

मूलभूत सुविधा उपलब्ध

महापालिकेनं चैत्यभूमी (शिवाजी पार्क) नजीकच्या काही शाळांमध्ये अनुयायींसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. सुमारे १०,००० लोकांच्या राहण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कमध्ये तंबू, व्हीआयपी खोल्या आणि नियंत्रण कक्षांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ आणि सूर्यवंशी सभागृह मार्गावरील ३ ठिकाणी आरोग्य शिबिरंही लावण्यात आली आहेत.

निवारा व्यवस्था

१ लाख चौरस फूट क्षेत्रात तात्पुरते निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, पार्क मैदान आणि आसपासच्या भागात १८० मोबाइल शौचालये बसविण्यात आली आहेत. जमिनीवर किमान ३८० तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसविण्यात आल्या आहेत. तसंच, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनयात्रेवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार असून, १ लाख प्रती नि: शुल्क वाटप करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा -

‘सनातन’वर बंदी घाला, हुसेन दलवाई यांची मागणी

राणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा