Advertisement

पालिकेची नजर, मुंबईत नव वर्षासाठी मार्शल तैनात

२४ प्रशासकीय प्रभागांमध्ये मार्शलची तैनाती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेची नजर, मुंबईत नव वर्षासाठी मार्शल तैनात
(File Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) शहरातील सर्व २४ प्रशासकीय प्रभागांमध्ये मार्शलची तैनाती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान ४८ तपासणी पथके तयार करण्याची घोषणा नुकतीच पालिकेनं केली होती. त्यानुसार मार्शलची पथकं तैनात केली जाणार आहेत.

प्रशासकिय संस्थेनं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच सार्वजनिक ठिकाणी मास्कच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी मार्शलची संख्या ७०० वरून अनिर्दिष्ट संख्येपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

पालिकेनं २५ आणि २६ डिसेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल १५ हजार १४४ लोकांवर गुन्हे दाखल केले आणि ३०.२८ लाख रुपये दंड वसूल केला.

त्यामुळे, यातील बहुतांश मार्शल ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी मुंबईतील समुद्रकिनारे आणि प्रमुख पर्यटनस्थळांवर तैनात केले जातील. यामध्ये सणासुदीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी वाहतूक होते अशा ठिकाणांचा यात समावेश आहे.

SWM विभाग मार्शलची नियुक्ती करते. हे मार्शल मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसूल करते. अधिकाऱ्यानं सांगितलं की, मार्शल्सना या वीकेंडसाठी शिफ्ट देण्यात येणार आहेत जेणेकरून ते रात्रीही काम करू शकतील.

आकडेवारीनुसार, मरीन ड्राइव्हचा समावेश असलेल्या ए वॉर्डमध्ये सर्वाधिक म्हणजेच २,४२९ उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर वांद्रे क्षेत्राचा समावेश असलेल्या एच/पश्चिम वॉर्डमध्ये उल्लंघन करणाऱ्यांची संख्या ६७० आहे.

एका वरिष्ठ प्रशासकिय अधिकार्‍यानं सांगितलं की, सणासुदीच्या आठवड्याच्या शेवटी दंड ठोठावण्यात आलेले बहुतेक लोक एकतर वांद्रे, मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटीमधील पर्यटक होते.

अधिका-यांनी असंही सांगितलं की, वॉर्ड अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या आणि आचारसंहितेचा भंग झाल्यास आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.हेही वाचा

मुंबईतल्या 'या' वॉर्डांमध्ये सर्वाधिक कोविडचे रुग्ण

कांदिवलीतील म्हाडाच्या जुन्या इमारतीला भीषण आग

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा