Advertisement

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडून 'एनडी'ही वसुलणार दंड

'क्लीन अप मार्शल' योजना राबवणाऱ्या महापालिकेनं पुन्हा एकदा 'उपद्रव शोधक पथका'ला सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे 'एनडी' रस्त्यांवर उतरुन मुंबईतील दुकानदार, मार्केट, तसंच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडून 'एनडी'ही वसुलणार दंड
SHARES

मुंबईत अस्वच्छता कारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या 'उपद्रव शोधक पथका'चं (एनडी टीम)महत्व कमी करून 'क्लीन अप मार्शल' योजना राबवणाऱ्या महापालिकेनं पुन्हा एकदा 'उपद्रव शोधक पथका'ला सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे 'एनडी' रस्त्यांवर उतरुन मुंबईतील दुकानदार, मार्केट, तसंच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. यासाठी उपद्रव शोधकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात येणार आहेत.


म्हणून निर्णय

मुंबईत अस्वछता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी २००० साली 'क्लीन अप' अंतर्गत उपविधी बनवण्यात आला. त्यानंतर २००७-०८ मध्ये 'क्लीन अप मार्शल' योजना राबवून प्रत्यक्षात दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. तेव्हापासून उपद्रव शोधक पथकाकडे दुर्लक्ष करून 'क्लीन अप मार्शल' योजनेकडे महापालिकेने अधिक लक्ष पुरवलं. असं असलं, तरी 'क्लीन अप मार्शल' योजना सुरू करण्याचा हेतू साध्य झालेला नाही. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक आल्यानंतर महापालिकेने 'क्लीन अप मार्शल'सोबत आता उपद्रव शोधक पथकाला सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे.


किती जणांचं पथक?

मुंबईतील २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी ८ ते१० जणांचं पथक असून गेल्या काही वर्षांत या पथकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही पदेच भरली गेली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 'क्लीन अप मार्शल' यांची नियुक्ती करण्यासाठी आता निविदा अटींमध्ये सुधारणा केली जात आहे. 'क्लीन अप मार्शल' बरोबर आता उपद्रव शोधक पथकावरही अधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे.


दंडात्मक कारवाई

यासाठी उपद्रव शोधक पथकाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 'क्लीन अप मार्शल' योजना राबवताना अस्वछता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परंतु आपले उपद्रव शोधक पथकातील कर्मचारीही दंडात्मक करवाई करणार आहेत. विभागातील हे 'एनडी' जिथे नागरिक, व्यापारी, दुकानदार, गाळेधारक कचरा करून अस्वछता करताना आढळून आल्यास त्यांच्यावर ते कारवाई करतील, असं शंकरवार यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

स्वच्छता दूरच; क्लीनअप मार्शल्सनी वर्षभरात केली ४ कोटींची कमाई!

तक्रार आल्यास क्लीनअप मार्शलवर होणार कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा