Advertisement

योजना संपताच खड्ड्यांकडं पालिकेचं दुर्लक्ष

खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा या योजनेची मुदत संपल्यानंतर आता मुंबई महापालिकेने (बीएमसी) खड्ड्यांच्या तक्रारींकडं दुर्लक्ष केलं आहे.

योजना संपताच खड्ड्यांकडं पालिकेचं दुर्लक्ष
SHARES

खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा या योजनेची मुदत संपल्यानंतर आता मुंबई महापालिकेने (बीएमसी) खड्ड्यांच्या तक्रारींकडं दुर्लक्ष केलं आहे. योजना संपल्यानंतर नागरिकांनी काही खड्ड्यांच्या तक्रारी केल्या. मात्र, पालिकेने या तक्रारींची दखल घेतली नसल्याचं दिसून आलं. याशिवाय ज्या नागरिकांनी खड्ड्यांच्या तक्रारी केल्या त्यांना अद्याप बक्षीसही मिळालेलं नाही. 

बीएमसीने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत खड्डे दाखवा, ५०० रुपये  मिळवा ही योजना राबवली. नागरिकांनी खड्ड्याची तक्रार केल्यानंतर चोवीस तासांत खड्डा न बुजवल्यास पालिका अधिकारी वा कंत्राटदाराच्या खिशातून ५०० रुपयांचे बक्षीस तक्रारदाराला दिले जाईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. मुंबईकरांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला. तब्बल दोन हजारांहून अधिक तक्रारी अॅपवर आल्या.  यामधील ९० टक्के खड्डे २४ तासांमध्ये बुजवण्यात आले. मात्र, योजना संपताच खड्ड्यांच्या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं जात आहे. 

योजना संपल्यानंतर खड्ड्यांच्या २५० हून अधिक तक्रारी अॅपवर आल्या. मात्र, यापैकी ५० टक्के खड्डेच भरण्यात आले.  तक्रारी उशिरा मिळाल्या, पालिकेच्या नियमांत खड्डे बसत नाहीत, खड्डे आमच्या अखत्यारीत नाहीत अशी विविध कारणे देऊन आमच्या तक्रारी घेतल्या नाहीत, असं  अनेक तक्रारदारांचं म्हणणं आहे. तर जे नागरिक बक्षिसास पात्र आहेत त्यांनाही अद्याप बक्षीस मिळालेलं नाही.



हेही वाचा -

आग विझवण्यासाठी पालिका आणणार 'ही' नवी यंत्रणा

स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा