Advertisement

बंद शाळा भाडेतत्वावर देण्यास पालिकेचा नकार

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईत एकूण १३०० शाळा आहेत. याधील १०० पेक्षा अधिक शाळा मागील ५ वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळं १४ खासगी मराठी शाळांनी पालिकेला या शाळांच्या इमारती भाडेतत्वावर देण्याची मागणी केली होती.

बंद शाळा भाडेतत्वावर देण्यास पालिकेचा नकार
SHARES

मुंबई पालिकेच्या बंद असलेल्या शाळांच्या इमारती खासगी शाळांनी भाडेतत्वावर मागितल्या होत्या. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार पालिकेने या शाळांच्या इमारती खाजगी शाळांना देण्यास नकार दिला अाहे. 


१०० शाळा बंद

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईत एकूण १३०० शाळा आहेत. याधील १०० पेक्षा अधिक शाळा मागील ५ वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळं १४ खासगी मराठी शाळांनी पालिकेला या शाळांच्या इमारती भाडेतत्वावर देण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेनं खासगी शाळांची ही मागणी नाकारली आहे.


न्यायालयात याचिका 

 याआधी पालिकेनं त्यांच्या शाळांतील काही खोल्या सामाजिक संघटना अाणि राजकीय संघटनांना शैक्षणिक कामांसाठी दिल्या होत्या. मात्र, या खोल्यांचा गैरवापर होत असल्याचे अाढळून अाले. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं पालिका शाळांच्या इमारती खासगी शाळांना भाडेतत्वावर देऊ नये असा अादेश दिला. 



हेही वाचा - 

CBSE परीक्षांचं वेळापत्रक जाहीर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा