Advertisement

दुकानांसमोर फेरीवाला बसल्यास दुकानदारांवर कारवाई

फेरीवाल्यांना संरक्षण दिल्याप्रकरणी ज्या दुकानांसमोर फेरीवाले आढळून येतील, त्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. त्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील भुयारी मार्गावरील दुकानांपासून झाली आहे.

दुकानांसमोर फेरीवाला बसल्यास दुकानदारांवर कारवाई
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी असतानाही काही ठिकाणी दुकानांच्या समोर फेरीवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांना दुकानदारांची साथ असल्याचं निदर्शनास आल्यामुळे आता फेरीवाल्यांना संरक्षण दिल्याप्रकरणी ज्या दुकानांसमोर फेरीवाले आढळून येतील, त्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. त्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील भुयारी मार्गावरील दुकानांपासून झाली आहे.


दुकानदारांचं सहकार्य

सीएसएमटी येथील दुकानांबाहेर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन महापालिकेच्या ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी येथील विनित किड्स कॉर्नर याला दुकानाला नोटीस बजावली. या नोटीसमध्ये आपल्या दुकानासमोर फेरीवाले अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचे सी.सी.टिव्ही कॅमेरांद्वारे निदर्शनास आल्याचं म्हटलं आहे.


पादचाऱ्यांना अडथळा

दुकानदारांचं सहकार्य असल्याशिवाय अनधिकृत फेरीवाल्यांना आपल्या दुकानासमोर व्यवसाय करणे शक्य होणार नाही. या अनधिकृत फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे, तसंच भविष्यात काही दुघर्टना घडून मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे.


अधिनियमानुसार कारवाई

त्यामुळेअशाप्रकारे फेरीवाले आपल्या दुकानासमोर निदर्शनास आल्यास आपल्या दुकानावर महापालिक अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल तसंच आपले दुकान सीलबंद करण्यात येईल,अशा प्रकारचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आली. या नोटीसची प्रत स्थानिक पोलिस ठाण्यालाही देण्यात आली.


तर, दुकान सील

याबाबत ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सीएसएमटी सब वेमध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंदी आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई केल्यानंतरही काही दुकानदारांच्या मदतीने ते याठिकाणी बसून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशाप्रकारचे कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता केवळ एका दुकानाला ही नोटीस पाठवली आहे. आपल्या दुकानासमोर अन्य कुणालाही धंदा करू न देणं हे संबंधित दुकानदाराचे कर्तव्य आहे. त्यांनी कुणाही फेरीवाल्याला आपल्या दुकानसमोर बसू नये. परंतु या नोटीसनंतरही दुकानांसमोर फेरीवाले आढळून आल्यास ती दुकानेच सील करण्यात येतील, असं किरण दिघावकर यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

मनसेचा पुन्हा अल्टीमेटम! फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा

फेरीवाला क्षेत्रांबाबत फक्त १७०० हरकती, सूचना



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा