Advertisement

मुंबई महापालिकेचं आता ‘झिरो टोलरन्स फॉर पॉटहोल’


मुंबई महापालिकेचं आता ‘झिरो टोलरन्स फॉर पॉटहोल’
SHARES

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांचं प्रमाण यंदा कमी असल्याचा दावा करत प्रशासनानं युटिलिटीजच्या खोदकामांमुळेच खड्डयांचं प्रमाण वाढलं अाहे, असं सांगत अापली जबाबदारी झटकली अाहे. खोदलेले चर योग्य प्रकारे न बुजवल्यामुळेच खड्डे पडत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे रस्ते कामांविषयी आता 'झिरो टोलरन्स फॉर पॉटहोल' अशाप्रकारची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली असून या अंतर्गत कंत्राटदार, विविध उपयोगितांसाठी (युटीलिटीज) चर खोदणाऱ्या संस्था वा संबंधित अधिकारी यांच्या चुकीमुळे किंवा कामातील त्रुटीमुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्चिती कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी दिले.


खड्ड्यांविषयी अायुक्तांची बैठक

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच खातेप्रमुखांची मासिक आढावा बैठक महापालिका मुख्यालयात शनिवारी पार पडली. या बैठकीत खोदण्यात येणाऱ्या चरींमुळे खड्डे पडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत असल्याने चरींबाबत कठोर निर्णय घेण्यात आला आहे.


खोदलेल्या चरींना कंत्राटदाराचे नाव

खोदण्यात आलेली चर कुणाची आहे, हे समजले जावे आणि त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करता यावी, यासाठी आता चर खणणाऱ्या कंपन्यांची नावे त्या ठिकाणी लिहिणे बंधनकारक करण्यात आलं आहे. चर खोदण्याचे काम झाल्यावर व चर भरल्यानंतर सदर ठिकाणीदेखील संबंधित उपयोगितेचे व कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक 'थर्मेास्टेट' सारख्या उच्च दर्जाच्या रंगांने लिहिणे आवश्यक करावे, असे आयुक्तांनी सांगितले.


त्या रस्त्यांवर खड्डे नाहीत

मुंबईतील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता वाढावी तसंच रस्त्यांवर उद्भवणाऱ्या खड्ड्यांना प्रतिबंध व्हावा, यादृष्टीनं विविध मुलभूत कामं गेल्या ३ वर्षांत करण्यात आली. या अनुषंगाने रस्त्यांची कामं करताना प्रकल्प रस्ते, प्राधान्यक्रम-१ व प्राधान्यक्रम-२ या गटांमध्ये वर्गवारी करून कामे करण्यात आली. मात्र, ज्या रस्त्यांवर कामे करण्यात आली, तेथेही सकारात्मक परिणाम दिसून आले असून त्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचंही फारसं आढळून आलेलं नाही. मात्र, काही ठिकाणी खड्डे उद्भवले याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.


खड्डा पडण्याची कारणे शोधणार

हे खड्डे चर खोदण्याशी (ट्रेंचिंग) किंवा कंत्राटदाराने सुयोग्य प्रकारे काम न करण्याचे कारण आहे काय? यासारख्या कारणांचा शोध घेण्यासाठी व कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर आढावा घेण्याचे तसेच संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोर यांना आपल्या स्तरावर हा आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.


हेही वाचा -

राणीबागेत येणार नवा पाहुणा, पेंग्विन देणार गोड बातमी

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा