Advertisement

उत्कृष्ट आपत्कालीन व्यवस्थापनाबद्दल रश्मी लोखंडे यांचा गौरव


उत्कृष्ट आपत्कालीन व्यवस्थापनाबद्दल रश्मी लोखंडे यांचा गौरव
SHARES

मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने उल्लेखनीय कामगिरी केली. पाण्याचा निचरा होण्यासोबतच नागरिकांना मदत करण्यासाठी सर्वच यंत्रणांशी योग्य समन्वय साधून अपेक्षित कार्ये वेळेत पूर्ण करण्यात आली. याबद्दल आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी राजेंद्र लोखंडे यांना 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महापालिका अधिकाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीदरम्यान 'सप्टेंबर - २०१७' या महिन्यासाठी 'महिन्याचे मानकरी' (ऑफिसर ऑफ द मंथ) या बहुमानासाठी लोखंडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, आय. ए. कुंदन, विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त (विशेष) निता चौधर आदी उपस्थित होते.

रात्रंदिवस अव्याहतपणे व समर्पित वृत्तीने वर्षाचे ३६५ दिवस महापालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे करण्यात येणारे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. २९ ऑगस्टच्या अतिवृष्टी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी अक्षरशः दिवस रात्र कार्यालयात उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांसह अविरतपणे काम करुन त्यांना सोपविलेले कार्य सक्षमपणे पूर्ण केले. या दरम्यान त्यांनी विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेऊन समन्वय साधण्यासोबतच आपल्या विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीत उल्लेखनीय काम केले.
- अजोय मेहता, आयुक्त, महापालिका



हे देखील वाचा -

मुंबईतील तुंबलेल्या ठिकाणांचा कृती आराखडा

फायबरच्या झाकणाने घेतला अमरापूरकरांचा जीव?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा