Advertisement

अाणिक-वडाळा फ्लायओव्हरच्या खाली होणार जाॅगिंग पार्क


अाणिक-वडाळा फ्लायओव्हरच्या खाली होणार जाॅगिंग पार्क
SHARES

अाणिक-वडाळा फ्लायओव्हरच्या खाली जाॅगिंग पार्क बनवण्याची योजना मुंबई महापालिकेने तयार केली अाहे. बुधवार याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात अाला. कुर्ला अणि वडाळा बस डेपोमध्ये एल वाॅर्डला हा अाणिक-वडाळा फ्लायओव्हर जोडतो. 


२ कोटींचा खर्च

या योजनेसंबंधीत एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जाॅगिंग पार्क बनवण्याच्या कामाला २ महिन्यांत सुरूवात होणार अाहे. या कामासाठी २ कोटी रुपयांचा खर्च होणार अाहे. या कामाव्यतिरिक्त मीनाताई ठाकरे उद्यानात पाण्याच्या निचरा करण्याच्या कामाचाही या योजनेत समावेश अाहे. 


२७ बगीचे विकसीत

मुंबई महापालिकेने याअाधी मुंबईत २७ फ्लायअोव्हरच्या खाली बगीचे विकसीत करण्याची घोषणा केली अाहे. २०१६ मध्ये पालिकने माटुंगा येथे किंग्ज सर्कल अाणि रुईया काॅलेजच्या मध्ये नानालाल डी. मेहता फ्लायओव्हरच्या खाली वरिष्ठ नागरिकांसठी एक उद्यान अाणि चालण्यासाठी ट्रॅक विकसीत केला अाहे. 



हेही वाचा - 

#MeeToo च्या संकटात पोलिसांचा दिवाळी 'उमंग'?

आॅनलाइन तक्रार नोंदवायची कुठे? इंजिनीअरिंग काॅलेजांचा नियमाला हरताळ




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा