Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

सांताक्रूझमध्ये बनणार क्रीडा संकूल


सांताक्रूझमध्ये बनणार क्रीडा संकूल
SHARES

खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सांताक्रूझ येथे क्रीडा संकूल बनवण्याची योजना आखली आहे. यामध्ये जिम्नॅस्टिक, वॉलिबॉल कोर्ट, कबड्डी कोर्ट, बास्केटबाल कोर्ट, क्रिकेट पिच आणि जॉगिंग ट्रॅक यांचा समावेश असेल. बांधकाम झाल्यानंतर पालिका नाममात्र दरात क्रीडा संकूल नागरिकांना उपलब्ध करून देईल.


प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय

या क्रीडा संकूलात आऊट डोर खेळ खेळता येणार असून प्रेक्षकांसाठी गॅलरीची सोय देखील करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे कॉम्पलेक्स तीन एकरमध्ये असणार आहे. सध्या या क्रीडा संकूलाचा अर्धा भाग नागरिकांकडून वापरला जात आहे.


2019 पर्यंत होणार तयार

पालिकेचे उपआयुक्त किशोर क्षीरसागर म्हणाले, या क्रीडा संकूलाचं डिझाइन तयार केलं जात असून एक महिन्यात निविदा जारी करण्यात येईल. तसंच 2019 पर्यंत हे क्रीडा संकूल बांधून तयार होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

एका वरिष्ठ नागरि अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सामान्यांना नाममात्र दरात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा