Advertisement

वडापाव पेपरमध्ये गुंडाळून विकण्यास बंदी? महापालिकेत आणणार ठराव


वडापाव पेपरमध्ये गुंडाळून विकण्यास बंदी? महापालिकेत आणणार ठराव
SHARES

वडापाव असो किंवा इतर कुठलेही खाद्यपदार्थ स्टाॅलवरून विकत घेतल्यावर ते पेपरमध्ये गुंडाळून दिले जातात. आपणही मस्तपैकी या पदार्थांचा आस्वाद घेत पोटावरून हात फिरवतो. मात्र असं करताना पेपरमध्ये गुंडाळून दिलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असेल, याचा साधा विचारही आपण करत नाही. पण असा विचार न करणं आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

खासकरून वृत्तपत्रात बांधून दिलेले पदार्थ खाल्ल्यास वृत्तपत्राच्या शाईतील विषारी घटक आपल्या शरीरात जाऊन आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आता मुंबईत पेपरमध्ये गुंडाळून देण्यात येणाऱ्या वडापावसह इतर पदार्थांवर बंदी घालण्याचा विचार होत आहे. यासाठी सर्व नगरसेवक मिळून महापालिकेत एक प्रस्ताव आणणार आहेत.



ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी

मुंबईत वडापाव, भजी यासह अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून केली जाते. या कागदांमध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विक्री करण्यास तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार घातक रोगांच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी तसेच आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हे मुंबई महापालिकेचे आवश्यक आणि बंधनकारक कर्तव्य असल्याचे चेंबूरकर यांनी म्हटले आहे.



धोकादायक 'ग्राफाईट'

मुंबईतील कार्यालये, शाळा, रेल्वे स्थानके, चौक, नाके आणि गर्दीच्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते तळलेले पदार्थ हमखास वृत्तपत्रांच्या कागदांमध्ये गुंडाळून देतात. वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत 'ग्राफाईट' नावाचा अत्यंत विषारी घटक असतो. तो या कागदात गुंडाळलेल्या वडापाव, भजीसह इतर खाद्यपदार्थात शोषून घेतला जातो. तो आरोग्यास अतिशय धोकादायक असतो.

हा विषारी घटक कर्करोगासारख्या दुर्धर रोगास कारणीभूत ठरतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या कागदांमध्ये गुंडाळून विक्री करण्यास तात्काळ बंदी घातली जावी, ही आपली मागणी असल्याचे चेंबूरकर यांनी म्हटले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा