Advertisement

विक्रोळीमधील 13 अनधिकृत बांधकाम हटवली


विक्रोळीमधील 13 अनधिकृत बांधकाम हटवली
SHARES

मुंबई महानगर पालिकेकडून अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई धडाक्यात सुरू आहे, या कारवाईअंतर्गत आता पूर्वद्रुतगती मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटवत द्रुतगती मार्गाचा परिसर मोकळा करण्यात आला. विक्रोळीतल्या  द्रुतगती मार्गावरील मनोहरनगर आणि गोदरेज कंपाऊंडमधील 13 अनधिकृत बांधकामांसह 33 वाहने, मार्बलचा साठा हटवण्यात आलाय. पालिकेच्या एन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.विक्रोळी  पूर्व परिसरातील अर्ध्या किमीच्या भुखंडावर ही अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे ही अनधिकृत बांधकामे काही समाजविघातक घटकांकडून खोटी कागदपत्रे तयार करुन बांधली असल्याचे ही या कारवाईत समोर आले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने ही अनधिकृत बांधकामे हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने ही कारवाई केली आहे. मोकळ्या झालेल्या भुखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी 24 तास सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते. तर गोदरेज कंपनीकडून या भुखंडाचे आता सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून जाहिर करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा