Advertisement

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ३ वॉर्ड वाढले

मुंबईत ९ वॉर्ड वाढल्यामुळे प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे.

मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ३ वॉर्ड वाढले
SHARES

मुंबईतील ९ वाढीव वॉर्डसह नव्या सीमांकन आराखड्याला निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यामुळे पालिकेने नागरिकांना सूचना व हरकती सादर करण्यासाठी आज अधिसूचना जारी केली आहे. यानुसार मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी ३ वॉर्ड वाढले आहेत.

या अधिसूचनेवर हरकती-सूचना मागवण्यासाठी २६ ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांना १४ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हरकती सूचना सादर करता येणार आहेत.

मुंबईतीत ९ वॉर्ड वाढल्यामुळे प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. २०२२ ची पालिका निवडणूक २०११ च्याच जनगणनेनुसार होत असली तरी वाढीव लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर वॉर्डमध्ये प्रशासकीय कामांच्या नियोजनासाठी वॉर्डची संख्या वाढवण्यात आली आहे.

हे वाढीव वॉर्ड आणि नव्या सीमांकनाबाबत नागरिकांना निवडणूक मुख्य कार्यालय, जे. व्ही. शाह मंडई, युसूफ मेहर अली मार्ग, मस्जिद बंदर, मुंबई – 400 009 या ठिकाणासह प्रत्येक प्रभागांच्या करनिर्धारण संकलन विभागातही सूचना व हरकती सादर करता येणार आहेत.

वाढलेले वॉर्ड – 

मुंबई शहर (एकूण वॉर्ड – 56)

  • जी दक्षिण – प्रभादेवी
  • एफ दक्षिण – दादर
  • ई वॉर्ड – भायखळा

पूर्व उपनगर – (एकूण वॉर्ड – 69)

  • एल वॉर्ड – कुर्ला
  • एन वॉर्ड – घाटकोपर
  • एम पश्चिम – चेंबूर
  • पश्चिम उपनगर – (एकूण वॉर्ड – 102)
  • आर उत्तर – दहिसर
  • के पूर्व – अंधेरी पूर्व
  • आर दक्षिण – कांदिवली
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा