Advertisement

महापालिकाही उभारणार आयुर्वेदिक निसर्ग उद्यान


महापालिकाही उभारणार आयुर्वेदिक निसर्ग उद्यान
SHARES

मुंबईत एकेकाळी माहीम-धारावीच्या सीमारेषेवर असलेले डम्पिंग ग्राऊंड बंद करून तेथे राज्य सरकारने निसर्ग उद्यान बनवले आहे. मुंबईतील या एकमेव निसर्ग उद्यानाच्या धर्तीवर महापालिकाही लवकरच असे निसर्ग आयुर्वेदिक उद्यान बनवण्याचा विचार करत आहे. यासाठी महापालिका जागा शोधत असून ही जागा निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव बनवण्यात येईल, असे उद्यान विभागाने स्पष्ट केले आहे.


उद्यानांत वनौषधी, सुगंधी वनस्पती

उद्यान खात्यामार्फत महापालिकेच्या उद्यानात व विविध रोपवाटिकांमध्ये दुर्मिळ आयुर्वेदिक वनौषधींची जोपासना करण्यात येत आहे. महापालिकेच्या बहुतेक उद्यानात आयुर्वेदिक व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यात आली असून विद्यालयांमधील विद्यार्थी अभ्यासासाठी उद्यानांना भेटी देत असतात.  


उद्यान उभारण्यास अडचण नाही

मुंबईतील शहर, उपनगरांमधील मोकळ्या जागेचा शोध घेऊन येथे आयुर्वेदिक वनस्पती लावून हे निसर्ग उद्यान उभारता येऊ शकते. तसेच विद्यमान उद्यान आहे, त्या जागेवरही असे निसर्ग उद्यान उभारता येणार आहे. सुगंधी तथा सुवासिक झाडांऐवजी आयुर्वेदिक झाडे लावून हे निसर्ग उद्यान उभारले जाणार आहे. 

सध्या अशाप्रकारची झाडे उद्यान, बगीच्यात लावली जातात. पण ती एका कोपऱ्यात लावली जातात. परंतु केवळ याच झाडांची लागवड करून आयुर्वेदिक उद्यान विकसीत झालेले नाही. त्यामुळे अशीच झाडे लावून हे निसर्ग उद्यानांच्या धर्तीवर कोणत्या जागेवर हे निसर्ग उद्यान तयार करता येईल याची शाहनिशा केली जात असल्याचे उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले.


भावी पिढीसाठी

लुप्त होणाऱ्या अतिप्राचीन दुर्मिळ वनौषधींची लागवड व संवर्धन करून सर्वसामान्य मुंबईकरांना व भावी तरुण पिढीला आयुर्वेदिक वनौषधी ज्ञान अवगत करण्यासाठी असे आयुर्वेदिक उद्यान विकसीत करण्याची मागणी मनसेचे विद्यमान नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. भारतातील उत्तराखंड राज्यात रामायणकालीन प्राचीन संजीवनी वनस्पतीचा शोध व संवर्धनाचे काम होत आहे. मुंबईतही आयुर्वेदिक निसर्ग उद्यान असणे तितकेच गरजेचे असल्याचे नरवणकर यांनी म्हटले होते.



हे देखील वाचा -

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा कृती आराखडा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा