Advertisement

कोरोना नियमांचं उल्लंघन, मालाडचं डी मार्ट सील

संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

कोरोना नियमांचं उल्लंघन, मालाडचं डी मार्ट सील
SHARES

मालाड (Malad) (पश्चिम) इथल्या लिंक रोडवर स्थित ‘डी मार्ट’ (D Mart) स्टोअरमध्ये कोविड १९चा संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं (BMC) कारवाई केली आहे. मनपाच्या पी/उत्तर विभाग कार्यालयानं ही कारवाई करून हे स्टोअर सील केलं आहे.

संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोव्हिड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना लागू आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार या सर्व उपाय योजनांचे आणि निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणं बंधनकारक आहे. या अनुषंगानं तपासणी केली जात आहे. यामध्ये मालाडमधील लिंक रोड स्थित डी मार्ट स्टोअरमध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं.

डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचं आढळलं. तसंच कर्मचारी आणि ग्राहक हे सर्व जण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचंही निदर्शनास आलं. एकाच वेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून नियमांचा भंग केला.

डी मार्ट व्यावसायिक आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद (सील) करण्यात आलं आहे. तसंच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंगबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येवू नये, याविषयी तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईच्या अंधेरी पूर्व इथल्या D-मार्ट स्टोअर सिल करण्यात आले आहे. D मार्टनं COVID 19 प्रोटोकॉल संदर्भातील अनेक नियम मोडल्याचं आढळलं. त्यामुळेच पालिकेनं D मार्टवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचं उघड झालं आहे.

वृत्तानुसार, २५ मार्चला डी-मार्ट स्टोअरवर के ईस्ट एएमसी प्रशांत सपकाळे यांनी सिल लावला. महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी हे सुपरमार्केट कोरोनव्हायरसचा सुपर-स्प्रेडर्स ठरण्याची शक्यता वर्तवली. म्हणून त्यांनी स्टोअरला सील करण्याचे आदेश दिले.



हेही वाचा

एकाचवेळी दोन्ही हातांवर लस; कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी

एक रुग्ण आढळला तरी इमारतीतील सर्व रहिवाशांची होणार कोरोना चाचणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा