Advertisement

'खाद्य विक्रेत्यांच्या जागेचंही फायर ऑडिट करा'


'खाद्य विक्रेत्यांच्या जागेचंही फायर ऑडिट करा'
SHARES

मुंबईतील सर्व हॉटेल्समधील नियमबाह्य कामकाजामुळे अनेकदा आगीसारख्या दुघर्टना घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण असून मुंबईतील सर्व हॉटेलांचे दरवर्षी अग्निशमन दलाकडून अग्नि परिक्षण (ऑडिट) करण्याची मागणी आता नगरसेवकांकडून होत आहे.


वेगळीच दुकाने

मुंबईतील अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे प्रत्यक्षात वेगळ्याच नावाने परवाने असून त्याठिकाणी ते परवान्यापेक्षा वेगळ्या अर्थात खाद्यपदार्थाची दुकाने थाटत आहेत. परंतु यासाठी पुन्हा परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे एका व्यवसायासाठी परवानगी घेऊन दुसराच व्यवसाय वर्षानुवर्षे चालू राहतो. अशाप्रकारे बदलण्यात आलेल्या व्यवसायाकरीता अग्निप्रतिबंधक उपकरणांची व्यवस्था करून अग्निशमन खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येत नाही.


ठरावाची सूचना

परिणामी अशा ठिकाणी पुरेशा उपाययोजनाअभावी आगी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही तर आरोग्य विभागाचा परवानाही न मिळवता अन्न शिजवून विकण्याचा धंदा सुरुच असतो. यामुळे खाद्यपदार्थाचा योग्य दर्जाही राखला जात नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व उपहारगृहांचे दरवर्षी अग्निशमन दलाकडून अग्नि परिक्षण (फायर ऑडीट) आणि आरोग्य खात्याकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेविका नेहल शाह यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


'ना हरकत प्रमाणपत्रां'ची आवश्यकता

मुंबईतील उपहारगृहे, बेकरी, खाद्यगृहे आदी ठिकाणी खाद्यपदार्थ तयार करणे आणि त्यांची विक्री करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित खात्यांनी दिलेल्या परवाना प्रमाणपत्रांची तसेच अग्निशमन दलाच्या 'ना हरकत प्रमाणपत्रां'ची आवश्यकता असते. परंतु उपहारगृह तसेच खाद्य विक्रेते हे एका विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ विकण्यासाठी परवानगी घेतो आणि काही कालावधीनंतर तो व्यवसाय सुरळीत न चालल्यास दुसराच व्यवसाय करतो.

आज मुंबईत आरे सरीता अंतर्गत दूध विक्रीची परवानगी असताना प्रत्यक्षात त्याठिकाणी चायनीज पदार्थ, सँडवीज विक्री आदी खाद्यपदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा ठिकाणांची जर पाहणी केली तर प्रत्यक्षात त्यांचा परवाना कशासाठी मिळवला आणि ते कोणता व्यवसाय त्याठिकाणी करत आहेत,हे स्पष्ट होईल, असे नेहल शाह यांनी म्हटले आहे.



हेही वाचा-

प्रकल्पबाधितांच्या धोरणाअभावी रखडला रस्ते रुंदीकरणाचा विकास

महापालिका चिटणीसांना ‘स्थायी’ने बजावली कारणे दाखवा नोटीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा