Advertisement

महापालिका चिटणीसांना ‘स्थायी’ने बजावली कारणे दाखवा नोटीस


महापालिका चिटणीसांना ‘स्थायी’ने बजावली कारणे दाखवा नोटीस
SHARES

कोस्टल रोडच्या सल्लागार निवडीच्या प्रस्तावावरून प्रशासन आणि स्थायी समितीमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


म्हणून प्रस्ताव मंजूर

ही नोटीस पाठवल्यानंतरच्या पहिल्या सभेपासून ३० दिवसांमध्ये मंजूर न केल्यास तो प्रस्ताव मंजूर झाला, असं समजण्यात येतं. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आल्यानंतर ३० दिवसांमध्ये त्यावर निर्णय न घेतल्यानं प्रशासनाने तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं.

हा प्रस्ताव ज्या दिवशी कार्यक्रम पत्रिकेवर घेण्यात आला होता, त्यादिवसापासून ३० दिवस न झाल्याने सत्ताधारी शिवसेनेने तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला. तरीही प्रशासनाने महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं निवेदन केलं होतं.


तरीही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम

स्थायी समितीच्या पटलावर घेण्यात आल्यानंतर या प्रस्तावाची विधीग्राहताही संपली असल्यानं तो प्रस्ताव नियमबाह्य असल्याचा युक्तीवाद सत्ताधारी पक्षाने केला. पण तरीही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा देत अशाप्रकारची नोटीस दिल्याचं सांगितलं.


हेही वाचा - 

कोस्टल रोडवरून प्रशासन आणि स्थायी समितीत जुंपणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा