Advertisement

अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याला नोटीस

जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'प्रतीक्षा' बंगला आणि त्या शेजारच्या उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील ७ ते ८ फूट जागा महापालिकेनं मागितली आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याला नोटीस
SHARES

जुहू परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'प्रतीक्षा' बंगला आणि त्या शेजारच्या उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील ७ ते ८ फूट जागा महापालिकेनं मागितली आहे. 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'ची जागा ताब्यात घेतली जाणार असून अमिताभ बच्चन यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.


आणखी जागेची आवश्यकता

जुहू येथील एन. एस. रस्ता क्रमांक १० येथून जुहू चंदन चित्रपटगृहाकडून इर्ला उदंचन केंद्राकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळं वाहनचालक, पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. यामुळं पालिकेनं ४५ फुटांच्या संत ज्ञानेश्वर मार्गाचे ६० फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्ता रुंदीकरणाचं काम बरचस पूर्ण झालं आहे. मात्र, आणखी जागेची आवश्यकता असून, या मार्गावर असलेल्या 'सत्यमूर्ती रेसिडन्सी' आणि 'प्रतीक्षा' बंगल्याच्या आवारातील ७ ते ८ फूट जागेची आवश्यकता असल्याची माहिती समोर येतं आहे.


जागा सोडण्याची अट

जुहूतील संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी जंक्शनवरील या बंगल्यांच्या आवारातील जागांची मागणी पालिकेने केली होती. त्यासाठी संबंधितांना नोटीस देखील पाठवली होती. मात्र, के. व्ही. सत्यमूर्ती यांनी नोटीस मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, न्यायालयानं स्थगिती आदेश न दिल्यामुळं पालिकेनं 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या आवारातील जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी 'सत्यमूर्ती रेसिडन्सी'च्या जागी बंगला होता. या बंगल्याचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी जागा सोडण्याची अट घालण्यात आली होती. याठिकाणी ७ मजली इमारत बांधण्यात आली. मात्र, रस्त्यासाठी पालिकेला जागा हस्तांतरित करण्यात आली नव्हती. रस्तारुंदीकरणाचं काम सुरू झाल्यानंतर पालिकेनं जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.



हेही वाचा -

सुपर ओव्हरमध्ये हैद्राबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्स प्ले-ऑफमध्ये दाखल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा