Advertisement

यांत्रिक झाडू बंद करा - स्थायी समिती


यांत्रिक झाडू बंद करा -  स्थायी समिती
SHARES

मुंबईतील मोठ्या रस्त्यांसह काही भागांची सफाई यांत्रिक झाडूच्या माध्यमातून करायला भाग पाडणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यांत्रिक झाडू बंद करण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली. यांत्रिक झाडू ही कंत्राटदारांची पोट भरण्यासाठीच दिली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.


केवळ कंत्राटदारांसाठीच

पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील यांत्रिक झाडूच्या कंत्राटात फेरफार करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. यावेळी भाजपाच्या नगरसेविका अलका केरकर यांनी यांत्रिकी झाडूद्वारे पदपथांची सफाई होत नसल्याचं सांगत यांत्रिकी झाडूचा वापर करण्यात येऊ नये, अशी सूचना केली. यांत्रिक झाडुंचे कंत्राट हे केवळ कंत्राटदारांचे पोट भरण्यासाठी दिली जात असल्याचा आरोप  माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी केला. हे झाडू मधल्या बाजूने चालतात. पण बाजूचा कचरा साफ करत नाही. तसेच पाईपद्वारे खेचून कचरा साफही केली जात नसल्याचं सांगत ही पध्दतच बंद केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.


एस.व्ही , लिंकींग रोडवर नको

शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी यांत्रिक झाडू रस्त्यांच्या मधोमध फिरवून त्याची दोन्ही चाके वर केली जातात आणि पंख्याद्वारे कचरा दोन्ही बाजुला पसरला जातो, असं सांगितलं.  पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर याचा वापर केला जात असला तरी एस.व्ही रोड, लिंकींग रोडवर याचा वापर करू नये, अशी सूचना त्यांनी केली.



हेही वाचा -

प्लास्टिक बंदी : आता भरा ५ हजार रुपये दंड, राज्य सरकारचा दंड शिवसेनेला मान्य

आरेतील आदिवासींना हात लावायचा नाही- उच्च न्यायालय


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा