Advertisement

पालिकेच्या कोरोना कॉल सेंटरचा 6 हजार नागरिकांना फायदा

कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवणाऱ्या नागरिकांना घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने कॉल सेंटरची सुविधा सुरू केली आहे.

पालिकेच्या कोरोना कॉल सेंटरचा 6 हजार नागरिकांना फायदा
SHARES

कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवणाऱ्या नागरिकांना घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने कॉल सेंटरची सुविधा सुरू केली आहे. या कॉल सेंटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 10 दिवसात तब्बल 6 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी दूरध्वनी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे. 020-470-85-0-85 या  दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीत तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना दिलं जात आहे.

काॅल करणाऱ्यांपैकी 319 व्यक्तींना कोरोनाविषयक वैद्यकीय तपासणी करवून घेण्यासाठी रेफर करण्यात आले आहे. संशयितांना त्यांची वैद्यकीय चाचणी करवून घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासू नये यासाठी घरी येऊन नमुने घेऊन जाणाऱ्या प्रयोगशाळांचे दूरध्वनी क्रमांक कॉल सेंटरद्वारे देण्यात येत आहेत. महापालिकेच्या कॉल सेंटरला दूरध्वनी करून मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तींपैकी 1 हजार 224 व्यक्तींना घरच्या घरीच विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरच्या घरी विलगीकरण करताना काय काळजी घ्यावी, ते कसे करावे, किती दिवस पर्यंत करावे? इत्यादी बाबतचे मार्गदर्शन व सूचना संबंधित व्यक्तीला दूरध्वनीद्वारेच देण्यात आल्या.

कॉल सेंटरद्वारे रेफर करण्यात आलेल्या व्यक्ती आणि याव्यतिरिक्त ज्यांच्या वैद्यकीय तपासण्यांसाठीचे नमुने खाजगी प्रयोगशाळांद्वारे घरच्या घरून गोळा करण्यात आले. त्यापैकी 130 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या बाधा झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून आवश्यक ते औषधोपचार सुरू करण्यात आले. 

 कॉल सेंटरच्या सुविधेमुळे कोरोनाची लक्षणे वाटत असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मनातील शंकेचे निरसन सहजपणे व घरबसल्या करता येत आहे. या दूरध्वनी मार्गदर्शनादरम्यान दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांना आढळून आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून कोरोनाची चाचणी करवून घेण्याचे निर्देशित करण्यात येत आहे. कॉल करणाऱ्या सर्व नागरिकांची लक्षणे, दूरध्वनी क्रमांक, राहत असलेला परिसर इत्यादी बाबींची नोंद कॉल सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.  त्यांना कॉल सेंटरद्वारे फोन करण्यात येत असून आवश्यक तो पाठपुरावा देखील नियमितपणे करण्यात येत आहे. 



हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा