Advertisement

पालिका ५० ठिकाणी खाद्य ट्रक सुरू करणार

मुंबईतील ५० ठिकाणी खाद्य ट्रक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

पालिका ५० ठिकाणी खाद्य ट्रक सुरू करणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) एक तपशीलवार फूड ट्रक धोरण समितीसमोर मंजुरीसाठी मांडले आहे. ज्यात मुंबईतील ५० ठिकाणी खाद्य ट्रक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

धोरणानुसार "फूड ऑन व्हील्स" च्या धर्तीवर नियोजित फूड ट्रकच्या स्लॉट्सची निविदा काढली जाईल. फूड ट्रक्सना एका ठिकाणाहून चालवण्याची परवानगी दिली जाईल आणि संपूर्ण शहरात चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

असं अपेक्षित आहे की, एकदा धोरण मंजूर झाल्यानंतर, प्रशासकिय प्राधिकरण निविदा काढेल आणि फूड ट्रक चालवण्यासाठी बोलीदारांची निवड करेल. याशिवाय, एकूण स्थानांपैकी जवळपास २५ टक्के किंवा ५० टक्के जागा महिला स्वयं-सहायता गटांना दिल्या जातील, असं वर्णन नमूद केलं आहे.

शिवाय, हे स्थान ३६ महिन्यांसाठी दिले जाईल आणि फूड ट्रकची जागा उद्यान, पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक संस्थांसारख्या ठिकाणी ठरवली जाईल. याव्यतिरिक्त, ट्रकचे स्थान प्रचलित रेस्टॉरंटपासून किमान २०० फूट अंतरावर असावे आणि दोन ट्रकमध्ये किमान १५ फूट अंतर असावे.

जागा निश्चित झाल्यानंतर, नागरिक १५ दिवसांपर्यंत त्यांच्या शिफारसी आणि हरकती पाठवू शकतात. प्रशासकियं अधिकार्‍यांना फूड ट्रकच्या स्थानाजवळ राहणार्‍या नागरिकांना युनिटमध्ये समस्या येणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

या धोरणात "फूड ऑन व्हील" द्वारे संतुलित आणि पौष्टिक जेवण विकण्यावर भर देण्यात आला आहे. फूड ट्रकचे मालक एलपीजी, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक कुकिंग युनिट्स वापरू शकतात.

मुंबई अग्निशमन दल, पालिकेचा आरोग्य विभाग तसंच दुकान आणि आस्थापना विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे देखील अनिवार्य आहे. त्यांना चालकांसाठी राज्य परिवहन महामंडळाची परवानगी घ्यावी लागेल, असे ठळक अहवालात नमूद करण्यात आले आहे.



हेही वाचा

पालिकेनं मुंबईतील लसीकरण केंद्रे कमी करण्याचा निर्णय का घेतला?

२३, २४ फेब्रुवारीला १७ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा