चेंबुरमध्ये अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेची कारवाई

 Mumbai
चेंबुरमध्ये अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेची कारवाई

चेंबूर - अनेकदा नोटीस देऊनही तानसा पाईपलाईनवरील झोपड्या रिकाम्या होत नसल्याने शुक्रवारी पालिकेने चेंबूर सहकारनगर येथील 50 ते 60 झोपड्यांवर तोडक कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांपासून तानसा पाईपलाईनचे काम रखडलेले होते. 

मात्र, वर्षभरापासून पुन्हा हे काम सुरु झाल्याने गेल्या वर्षभरात पालिकेने चेंबूर परिसरातील अडीच ते तीन हजार झोपडया हटवल्या आहेत. आताही काही झोपड्या याठिकाणी उभ्या असल्याने पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाकडून शुक्रवारी याठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली. या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेहरुनगर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.

Loading Comments