Advertisement

पालिका वरळी किल्ल्याचं सुशोभीकरण करणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण उपक्रम हाती घेतला आहे.

पालिका वरळी किल्ल्याचं सुशोभीकरण करणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण उपक्रम हाती घेत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय वरळी हा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.

या प्रकल्पाची किंमत २ कोटी आहे आणि एका वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शिवसेना या जागेचा आणखी विकास करू पाहत असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

१ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय, २६ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची निविदा काढण्यात आली.

वरळी किल्ला ब्रिटीशांनी वरळी टेकडीवर १६७५ च्या सुमारास बांधला होता. ज्यातून माहीम खाडी दिसते. त्या काळात मुंबईत फक्त सात बेटे होती. शत्रूच्या जहाजांवर तसंच समुद्रावर लक्ष ठेवणे हा किल्ल्याचा उद्देश होता.

वरळी किल्‍ल्‍याच्‍या सुशोभिकरणासोबतच माहीम किल्‍ल्‍याचा जीर्णोद्धार करण्‍याचाही प्राधिकरणाचा विचार आहे. त्यासाठी कुर्ला इथं पुनर्वसन करून त्याच्या परिसरातील ३०० झोपड्या हटवण्याचा विचार आहे.

मागील आठवड्याच्या सुरुवातीला, रीगल सिनेमाजवळील शिवसेना संस्थापक दिवंगत बाळ केशव ठाकरे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पालिका हाती घेण्याचा विचार करत असल्याची बातमी आली होती.



हेही वाचा

ठाण्यातील खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी होणार खुला

मुंबईतल्या 'या' ८ मॉल्समध्ये करा रात्रीची पार्किंग

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा