Advertisement

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून पाणीकपात लागू

जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून पाणीकपात लागू
SHARES

मुंबईकरांवर पाणीकपतीचं संकट ओढवलंय. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरात येत्या गुरुवार 30 मेपासून 5 टक्के पाणीकपात होणार आहे. तर 5 जूनपासून  10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हवामान विभागानुसार गेल्या दोन वर्षात म्हणजे 2021 आणि 2022 मध्ये मान्सून हा 15 ऑक्टोबरपर्यंत सक्रीय झाला होता.

तर गेल्या वर्षी 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेते हवा तसा पाऊस ( Mumbai Rains) झाला नाही.

गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणारा धरण्यात सुमारे 5.64 टक्के पाणीसाठी कमी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 

दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसर करण्याच आवाहन मुंबई महापालिकेने केलंय. त्याशिवाय पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात, असा सल्ला दिला आहे. 

25 मे पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 1,40,202 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या, वार्षिक 14,47,363 दशलक्ष लिटरच्या तुलनेत केवळ 9.69% पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती BMC अधिकाऱ्यांनी दिली. 

बीएमसी प्रशासन पाणीसाठ्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि दररोज नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा करत आहे. समाधानकारक पाऊस होईपर्यंत आणि जलसाठ्यातील उपयुक्त साठा सुधारेपर्यंत पाणीकपात लागू राहील.

“मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, BMC प्रशासन सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नम्र आवाहन करते. पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करून, मुंबईकरांनी शक्य तितक्या पाण्याची बचत करावी, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

2021 आणि 2022 मध्ये, मान्सून 15 ऑक्टोबरपर्यंत सक्रिय होता. तथापि, 2023 मध्ये, ऑक्टोबर महिन्यात तुलनेने खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 5.64 टक्के पाणीसाठा कमी आहे.

इतकंच नाही तर मुंबईला भातसा धरणातून 1,37,000 दशलक्ष लिटर आणि अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळणार आहे. याचा अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

त्याचप्रमाणे, भारतीय हवामान खात्याने या वर्षी मान्सून वेळेवर येण्याचा अंदाज वर्तवला आहे, ही देखील एक सकारात्मक बाब आहे,” बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

मुंबईत मान्सून लवकर दाखल होणार, उन्हापासून मिळणार दिलासा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा