Advertisement

पालिकेच्या वाहनामध्ये सुका आणि ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र कप्पा!


पालिकेच्या वाहनामध्ये सुका आणि ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र कप्पा!
SHARES

मुंबईत यापूर्वी ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण केलं जात नव्हतं. पण आता ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करून स्वतंत्र विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात हा सुका कचरा वाहून नेण्यासाठी सक्षम यंत्रणाच पालिकेकडे उपलब्ध नव्हती. परिणामी या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आगामी सात वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या कचरा वाहून नेण्याच्या कंत्राटात सुका कचऱ्याबाबत प्रामुख्याने विचार केला जाईल. आणि ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांतच सुका आणि ई कचऱ्यासाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येईल, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.


विशेष गाड्यांची व्यवस्था

सुक्या कचऱ्यासोबच इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करण्यासाठी वाहनात स्वतंत्र रचना करण्यात येईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येईल. प्रत्येक सोसायटीला या कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे आदेश देतानाच हा सुका कचरा स्वतंत्रपणे वाहून नेण्यासाठी महापालिकेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी सुरुवातीला ४६ वाहने पुरवण्यात आली होती. ही संख्या आता ९४ पर्यंत नेण्यात आली आहे. या वाहनांमधून आतापर्यंत सुका कचरा स्वतंत्रपणे सोसायटींमधून जमा करून वाहून नेला जात होता. पण नव्याने सात वर्षांसाठी मागवलेल्या निविदांमधील कंत्राटात सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रथम लहान आणि मोठ्या कॉम्पॅक्टर्समध्ये त्या वाहनांच्या आकारमानाच्या  ९० टक्के जागा ओल्या कचऱ्यासाठी तर सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी १० टक्के एवढी जागा कप्पा करून ठेवण्यात येईल.


आता ही सवय लावा

प्रत्येक इमारतीचा सुका आणि ओला कचरा एकत्र न होता एकाच वाहनातून वेगवेगळा वाहून नेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा वर्गीकरणाची सवय लागून डम्पिंग ग्राऊंडवरील भार कमी होईल, असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन विभागाने व्यक्त केला आहे.

कचरा गोळा करून वाहून नेण्याच्या नवीन एम. एस. डब्ल्यू कंत्राटामध्ये प्रथमच सुका कचरा आणि ई कचऱ्याकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितलं. मुंबईत सुक्या कचऱ्यासोबत ई-कचऱ्याचीही मोठी समस्या आहे. पण आता सुक्या कचऱ्यासोबत ई कचराही रोज वाहून नेण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी म्हटलं आहे.


१० टक्के राखीव कप्पा

  • मोठे कॉम्पॅक्टर्स : एकूण ६ मेट्रिक टन कचरा
  • साईटलोडिंग कॉम्पॅक्टर्स : एकूण ६ मेट्रिक टन कचरा
  • लहान कॉम्पॅक्टर्स : एकूण २.५ मेट्रिक टन कचरा
  • लहान बंद वाहने : एकूण ०.६ मेट्रिक टन कचराहेही वाचा

मुंबईतल्या चौपाट्या होणार चकाचक, 'फ्लोटींग ट्रॅश बूम्स' अडवणार कचरा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा