Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

मालाड, सायन आणि कांजुरमार्गमध्ये पालिका उभारणार ३ जम्बो कोविड सेंटर

महापालिकेनं त्यासाठी कंजूरमार्ग, मालाड आणि सायन यांचा समावेश असलेल्या तीन जागा शोधल्या आहेत.

मालाड, सायन आणि कांजुरमार्गमध्ये पालिका उभारणार ३ जम्बो कोविड सेंटर
SHARES

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुंबईत तीन अतिरिक्त जंबो केंद्रे उभारणार आहे. याअंतर्गत सुमारे ५ हजार ३०० बेडची व्यवस्था होणार आहे.

पालिका अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेनं त्यासाठी कंजूरमार्ग, मालाड आणि सायन यांचा समावेश असलेल्या तीन जागा शोधल्या आहेत. शहरात कोरोनाव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहता अतिरिक्त बेड तयार करण्यात येत आहेत.

याव्यतिरिक्त, पुढच्या महिन्यापर्यंत कांजूरमार्गमध्ये जंबो सेंटर तयार होईल. त्यानंतर मालाड आणि सायनमध्ये हे सेंटर उभारले जातील. या जंबो सेंटरमध्ये ७० टक्के बेड्स ऑक्सिजन सुविधेसह ठेवण्याची नागरी संस्थाची योजना आहे. तर उर्वरित युनिट (आयसीयू) बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड असतील.

दहिसर जंबो सेंटर, दहिसरमधील कंदरपाडा जंबो सेंटर, गोरेगाव इथलं नेस्को जंबो सेंटर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) जंबो सेंटर, एनएससीआय वरळी जंबो सेंटर आणि मुलुंड जंबो सेंटर इथं सध्या सहा जम्बो सेंटर आहेत.

दरम्यान, पालिकेनं अद्ययावत केलेल्या डॅशबोर्डनुसार शहरातील बेडचा ताबा ८२ टक्के आहे. म्हणजे एकूण २० हजार ६०८ खाटांपैकी १७ हजार ००५ बेड ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान देशात मागील चोवीस तासात सर्वाधिक ५१९ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये २७७, छत्तीसगड १९१, उत्तरप्रदेश १६२, गुजरात १२१, कर्नाटक १४९, पंजाब ६० , मध्य प्रदेश ७७ रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच जवळपास १ हजार ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण २०२० मृतांपैकी ७७.०२ टक्के आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६२ हजार ०९७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये २९ हजार ५७४, दिल्लीमध्ये २८ हजार ३८५, कर्नाटक २१ हजार ७९४, केरळ १९ हजार ५७७ आणि छत्तीसगडमध्ये १५ हजार ६२५  कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.हेही वाचा

मुंबईत तब्बल ४९ केंद्रे लससाठ्याअभावी बंद

महापालिका पावणेपाच कोटी रुपयांच्या यांत्रिकी झाडू खरेदी करणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा