Advertisement

महापालिकेच्या १३८८ पदांसाठी १५ ते २५ फेब्रुवारी दरम्‍यान परीक्षा


महापालिकेच्या १३८८ पदांसाठी १५ ते २५ फेब्रुवारी दरम्‍यान परीक्षा
SHARES

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी वर्गातील कामगार पदासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जावरील परीक्षा पुढील महिन्यात १५ ते २५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांच्या परीक्षा जिल्ह्यांच्या ठिकाणीच घेण्यात येणार असून याबाबत मेल व मोबाईद्वारे कळवण्यात आल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.२४ जानेवारीपासून ओळखपत्र पाठवणार

मुंबई महानगरपालिकेने 'ड' संवर्गातील १३८८ रिक्त पदे भरण्यासाठी ११ डिसेंबर, २०१७ रोजी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने एकूण २ लाख ८७ हजार ०८८ उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. २४ जानेवारी, २०१८ पासून ऑनलाईन परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ओळखपत्र पाठविण्यात येणार आहेत.


जिल्ह्याच्या ठिकाणीच परीक्षा

तसेच १५ फेब्रुवारी, २०१८ ते दिनांक २५ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी ऑनलाईन परि‍क्षा आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम बृहन्मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आल्‍याचं महापालिका कामगार विभागाने कळविलं आहे.हेही वाचा-

अशी असेल मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा