Advertisement

जोगेश्वरीतील हिंदू स्मशानभूमीचा होणार कायापालट

प्रतापनगर येथील हिंदू स्मशानभूमीतील दफनभूमी, शवदाहिनी, पर्जन्यवाहिन्या, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय तसेच जळाऊ लाकडांची वखार आदी मोडकळीस अाल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करण्याऐवजी त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे.

जोगेश्वरीतील हिंदू स्मशानभूमीचा होणार कायापालट
SHARES

जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर हिंदू स्मशानभूमीचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. या संपूर्ण स्मशानभूमीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे अगोदरप्रमाणे अाताही याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार अाहे. येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी आता पारशीवाडा किंवा गोरेगाव स्मशानभूमीची वाट धरावी लागणार आहे.


७१२.१७ चौ.मी. बांधकाम

प्रतापनगर येथील हिंदू स्मशानभूमीतील दफनभूमी, शवदाहिनी, पर्जन्यवाहिन्या, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय तसेच जळाऊ लाकडांची वखार आदी मोडकळीस अाल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करण्याऐवजी त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. एकूण ७१२.१७ चौरस मीटर क्षेत्रफळाचं बांधकाम करण्यात असून या बांधकामासाठी प्रति चौरस मीटरसाठी ३१ हजार ६६४ रुपये मोजले जाणार आहेत.


साडेचार कोटी रुपये खर्च

प्रतापनगर येथील स्मशानभूमीवर सध्या मोठा भार असून प्रत्येक दिवशी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच आता या स्मशानभूमीचा विकास हाती घेतल्यास याचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागणार आहे. स्मशानभूमी विकासासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार असून याकरता रिलायएबल एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.


कोणती बांधकामे होणार

  • जुनी शवदाहिनी तोडून नवीन बांधकाम
  • जुने शौचालय तोडून नवीन बांधकाम
  • नवीन दफनभूमीच्या बांधकामासह लाल मातीचा भराव
  • मृत्यू नोंदणींची खोली तोडून नवीन बांधकाम
  • पादचारी पायवाटा, रस्त्यांकरता स्टेनलेस स्टील रेलिंग
  • अपंगांसाठी शौचालय व शव दाहिनीकरता उतरंडीचे बांधकाम व आधाराकरता स्टेनलेस स्टीलचं रेलिंग
  • सुशोभीकरण, बांधकाम व विद्युत कामेहेही वाचा -

धक्कादायक : घरगुती मिठामध्ये प्लॅस्टिकचे कण; आयआयटीचं संशोधन

अबब! १ लाख ५६ हजार प्रति चौ. फूट दराने घराची विक्री 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा