Advertisement

अबब! १ लाख ५६ हजार प्रति चौ. फूट दराने घराची विक्री

वाळकेश्वर परिसरातील एका घराची विक्री प्रति चौरस फूट किती रुपयात झाली हे ऐकलं तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. हे घर प्रति चौरस फूट रु. १ लाख ५६ हजार रुपये किमतीला विकण्यात आलं आहे. हा मुंबईतील आतापर्यंतचा विक्रमी दर आहे.

अबब! १ लाख ५६ हजार प्रति चौ. फूट दराने घराची विक्री
SHARES

मुंबईत जागेला सोन्याचा भाव आहे असं उगाच म्हणत नाहीत. मुंबईत साधं झोपडं घ्यायचं म्हटलं, तरी भल्याभल्यांना परवडत नाही. कारण इथं झोपडंही लाख ते कोटींमध्ये विकलं जात. मुंबईत घरांच्या किमती कोटीच्या कोटींची उड्डाणे घेत असतात. अशात आता मुंबईतील एका मालमत्तेच्या खरेदी-विक्रीने नवा उच्चांक गाठला आहे.


घराच्या विक्रीचा उच्चांक

वाळकेश्वर परिसरातील एका घराची विक्री प्रति चौरस फूट किती रुपयात झाली हे ऐकलं तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. हे घर प्रति चौरस फूट रु. १ लाख ५६ हजार रुपये किमतीला विकण्यात आलं आहे. हा मुंबईतील आतापर्यंतचा विक्रमी दर आहे. याआधी १ लाख ४९ हजार प्रति चौरस फूट दरात एका घराची विक्री झाली होती. २०१८ मध्येच हे दोन्ही खरेदी-विक्री व्यवहार झाले असून हे दोन्ही व्यवहार आतापर्यंतचे विक्रमी व्यवहार आहेत.


या मालमत्तेला सोन्याचा भाव

वाळकेश्वर येथील लिजेंड कॉपरेटिव्ही हाऊसिंग सोसायटीमधील १९ आणि २० व्या मजल्यावरील हे डुप्लेक्स घर आहे. ३०१२ चौ फुटाचं हे घर ४७ कोटींमध्ये एस. झवेरी या ५० वर्षीय महिलेनं विकत घेतलं आहे. तर एम. महेश्वरी या ५०वर्षीय महिलेनं हे घर विकलं आहे. या घरासाठी एस. झवेरी यांनी १ लाख ५६ हजार रुपये प्रति चौरस फूट इतकी मोठी किंमत मोजली आहे. मालमत्तेच्या नोंदणी कागदपत्रावरून ही बाब समोर आली.

वाळकेश्वर परिसर प्राईम एरिया म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांचा वर्षां बंगला, राजभवन याच भागात असून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती इथंच राहतात. त्यामुळे या परिसरातील मालमत्तेला सोन्याचा भाव आहे. दरम्यान या घरासाठी झवेरी यांनी तब्बल २ कोटी ३५ लाख इतकं मुद्रांक शुल्क भरलं आहे. यात २० पार्किंग प्लेसचाही समावेश आहे.


दुप्पट किंमतीत घराची खरेदी

तसं पहायला गेलं तर रेडी रेकनरनुसार या घराची किंमत २७ कोटींच्या घरात जाते. पण हे घर मात्र ४७ कोटीमध्ये विकण्यात आलं आहे. कारण या इमारतीत हिरे व्यापारी आणि जैन समुदाय राहतो. त्यामुळे अशाच ठिकाणी घर हवं असणारे ग्राहक जास्त किंमत देतात असं बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच म्हणणं आहे.



हेही वाचा-

बांधकाम क्षेत्र गॅसवर! राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

बिल्डरांना टायटल इन्शुरन्स बंधनकारक होणार?




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा