Advertisement

अमेरिकन रोबो साफ करणार मुंबईतील गटार!

मुंबईच्या रस्त्यांखालील आणि रेल्वे ट्रॅकलगतच्या कल्व्हर्टची अर्थात गटारांची साफसफाई आता अमेरिकन रोबो करणार आहे.

अमेरिकन रोबो साफ करणार मुंबईतील गटार!
SHARES

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे ट्रॅक आणि रस्त्यांच्या खाली असलेल्या कल्व्हर्ट अर्थात गटारांची मुंबई महानगर पालिकेकडून नियमितपणे साफसफाई केली जाते. मात्र या कल्व्हर्टची उंची लक्षात घेता आत जाऊन त्यांची सफाई करणं अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे कल्व्हर्टची साफसफाई योग्यरित्या न झाल्यानं पाणी साचण्याचे प्रकार पावसाळ्यात अनेक ठिकाणी होतात. या समस्येवर मात करण्यासाठी, कल्व्हर्टची योग्यप्रकारे साफसफाई करण्यासाठी आता महानगरपालिकेनं अनोखी शक्कल लावली आहे. ती म्हणजे रोबोच्या माध्यमातून या कल्व्हर्टची साफसफाई करण्याची शक्कल आणि तीही साध्यासुध्या नव्हे तर चक्क अमेरिकन रोबोकडून. हो, मुंबईच्या रस्त्यांखालील आणि रेल्वे ट्रॅकलगतच्या कल्व्हर्टची अर्थात गटारांची साफसफाई आता अमेरिकन रोबो करणार आहे.



अमेरिकन रोबो करणार साफसफाई

पावसाळा पूर्व आणि पावसाळ्यानंतर अशी मुंबईतील कल्व्हर्टची साफसफाई महापालिकेकडून करण्यात येते. ही कल्व्हर्ट अत्यंत अरूंद असल्यानं साफसफाई यंत्राचा वापर त्यांच्या साफसफाईसाठी करत येत नाही. त्यामुळे कामगाराला कल्व्हर्टमध्ये उतरवत त्यांची साफसफाई करून घेतली जाते. पण यातही अनेक अडचणी येतात. कल्व्हर्टची उंची कमी असल्यानं कामगारांना आत शिरून योग्य रित्या साफसफाई करता येत नाही. कल्व्हर्टमधील सांडपाण्यावर तरंगणाऱ्या वस्तु काढण्याचेच काम बहुधा होते. त्यामुळे कल्व्हर्टमधील गाळ अनेकदा तसाच राहतो.



साफसफाई करणं होणार शक्य

यावर उतारा म्हणून पालिकेनं अमेरिकन रोबो आणला आहे. अत्याधुनिक असा अमेरिकन रोबो एप्रिलपासून सेवेते दाखल होणार आहे. अरूंद अशा कल्व्हर्टमध्ये सहजपणे जाऊन हा रोबो कल्व्हर्टची साफसफाई करणार आहे. तर एकावेळेला जास्तीत जास्त ७०० किलोचा गाळ काढण्याची क्षमता या रोबोची आहे. ४२ इंच उंची आणि ४२ इंच रूंदीचा, १२० इंच लांबीचा असा हा रोबो असून तो ३६० अंशात गोल फिरू शकणार आहे. त्यामुळे निमुळत्या जागेत जाऊनही साफसफाई करणं आता शक्य होणार आहे असल्याचा दावा पालिकेच्या पर्जन्यजल खात्याकडून घेण्यात आला आहे. अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनिया येथून हा रोबो आयात करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यानुसार लवकरच हा रोबो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

'विराट' कामगिरी, कोहलीची आयसीसी पुरस्कारांची हॅट्रिक

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भूमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा