कोरोना मृताच्या अंत्यविधीबाबतचा आदेश पालिकेकडून मागे

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात काढलेला आदेश तासाभरात मागे घेण्यात आला आहे.

कोरोना मृताच्या अंत्यविधीबाबतचा आदेश पालिकेकडून मागे
SHARES

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्यासंदर्भात काढलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले होते. पण तासाभरात त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

मुंबई महापालिकेने सुधारित परिपत्रक जारी आहे. या परिपत्रकानुसार मोठ्या जागेतील कब्रस्तानात अशा व्यक्तीला दफन करता येईल, असा बदल करण्यात आला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील  माहिती दिली आहे.

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी जारी केलेल्या पहिल्या आदेशात, 'कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. रुग्ण कोणत्याही धर्माचा असला तरी सुद्धा त्याचा मृतदेह दहन करण्यात यावा, असा उल्लेख करण्यात आला होता. अंत्यसंस्कारादरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. तसंच, जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाने मृतदेहाला दफन करण्याचा आग्रह केला तर मुंबई शहराच्या हद्दीबाहेर मृतदेह दफन करण्यास त्यांना परवानगी दिली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले होते. 


हेही वाचा -

राज्यात २१ ते ३० वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण

‘रामायण’, ‘महाभारता’नंतर 'शक्तिमान' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
संबंधित विषय