Advertisement

महापालिकेला कळलं कचरापेट्यांचं महत्त्व

कचरापेट्या मुक्त मुंबईचा नारा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता या पेट्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीताच आणखी १ हजार कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे.

महापालिकेला कळलं कचरापेट्यांचं महत्त्व
SHARES

मुंबईतील कचरापेट्यांची संख्या कमी करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता कचरा पेट्यांचं महत्व समजलं आहे. मुंबईत 'स्वच्छ भारत मिशन' राबवताना या कचरापेट्यांची गरज भासू लागली आहे. त्यामुळेच कचरापेट्या मुक्त मुंबईचा नारा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता या पेट्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीताच आणखी १ हजार कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे.


कचरापेट्या केल्या कमी

मुंबई महापालिकेच्या २४ विभागातील कचरा संकलन केंद्रावर महापालिकेच्यावतीनं १ बाय १ घनमीटर क्षमतेच्या लोखंडी पत्र्यांचे डबे ठेवले जातात. या कचरा पेट्यांतील कचरा उचलून कॉम्पॅक्टरमधून कचरा हस्तांतरण केंद्रात नेला जातो. आर.ए. राजीव महापालिका अतिरिक्त आयुक्त असताना त्यांच्याकडे घनकचरा विभागाचा पदभार होता. परंतु त्यावेळी राजीव यांनी मुंबईतील कचरा पेट्यांची ठिकाणेच कमी करून कचरापेट्या मुक्त मोहीम हाती घेतली.


कचरा रस्त्यावर

त्यामुळे मुंबईतील बऱ्याच कचरा पेट्या हद्दपार झाल्या आणि मोजक्याच ठिकाणी कचरा पेट्या राहिल्या. मात्र, कचरापेट्या कमी असल्याने अनेक ठिकाणी कचरा बाहेर फेकला जात आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात कचरा पेट्यांची संख्या वाढवली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता या कचरापेट्यांची संख्या वाढवताना प्रशासन दिसत आहे.


१ हजार कचरापेट्याची खरेदी

सध्या मुंबईतील विविध कचरा संकलन केंद्रावर सुमारे ६ हजार कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. ३ वर्षांपूर्वी १८२५ नग कचरा डब्यांची खरेदी केली होती. परंतु जुन्यापैकी बरेच डबे खराब झाल्यामुळे तसेच काही भागांमध्ये कचऱ्या पेट्यांची आवश्यक असल्यामुळे १ हजार कचरा डब्यांची खरेदी करण्यात येत असल्याचं उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी स्पष्ट केलं आहे.

नवीन कचरा पेट्या खरेदी केल्या जात असल्या नवीन ठिकाणी त्यांची संख्या वाढवली जात नाही. ज्या ठिकाणी कचरा पेट्यात तिथेच या पेट्यांचा वापर केला जाणार आहे. ज्याठिकाणी पेट्यातील कचरा ओसंडून वाहतात, काही तुटलेल्या आहे, अशाठिकाणी या कचरा पेट्यांचा बदलल्या जाणार असल्याचं, शंकरवार यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

निकृष्ट काम करणारी कंपनी काळ्या यादीत

तुंबलेल्या पाण्यातही भाजपाचं राजकारणसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा