Advertisement

आमदार निधीतून बांधलेल्या बेस्ट बस थांब्यावर होणार कारवाई

मुंबईतील पदपथांवरील बस स्थानके हटवण्याचा निर्धार महापालिकेने केलेला असतानाच दुसरीकडे अॅन्टॉप हिल येथील शेख मिस्री रोड, प्रतिक्षा नगर, मुकुंदराव मार्ग, जे. के. बसेन मार्ग आदी ठिकाणी भाजपा आमदार तमिळ सेल्वन यांच्या आमदार निधीतून पदपथांवर बस थांबे बनवण्यात येत असल्याने हा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

आमदार निधीतून बांधलेल्या बेस्ट बस थांब्यावर होणार कारवाई
SHARES

भाजपा आमदार तमिल सेल्वन यांनी आमदार निधीतून प्रतिक्षा नगर, अॅन्टॉप हिल परिसरात ७ ते ८ बेस्ट बस थांबे बनवले आहेत. हे सर्व बस थांबे पदपथ आणि रस्त्यांवरच बनवले असल्याने नागरिकांना सोयीऐवजी गैरसोयीलाच सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अशा गैरसोईच्या बस थांब्यावर कारवाई करण्यात येईल, असं महापालिकेने मंगळवारी स्पष्ट केलं.

मुंबईतील पदपथांवरील बस स्थानके हटवण्याचा निर्धार महापालिकेने केलेला असतानाच दुसरीकडे अॅन्टॉप हिल येथील शेख मिस्री रोड, प्रतिक्षा नगर, मुकुंदराव मार्ग, जे. के. बसेन मार्ग आदी ठिकाणी भाजपा आमदार तमिळ सेल्वन यांच्या आमदार निधीतून पदपथांवर बस थांबे बनवण्यात येत असल्याने हा मुद्दा चांगलाच गाजत आहे.


परवानगी दिलीच कशी?

पदपथ किंवा रस्त्यांवर बेस्ट बसचे थांबे बसवण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. तरीही महापालिकेने ही परवानगी दिली कशी? असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. हे बस थांबे चक्क पदपथांवरच बांधण्यात आली आहेत.

एका बाजूला पदपथावरील अतिक्रमण हटवलं जाते, मग दुसरीकडे अशाप्रकारचे अतिक्रमण निर्माण करण्यास परवानगी कशी दिली जाते, असा सवालही राजा यांनी केला. असंच असेल तर मलाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर अशा प्रकारे बस थांबे उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही राजा यांनी केली.


तर, कारवाई नक्की

एफ/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी आमदार निधीतून बेस्टचे बस थांबे उभारण्यास परवानगी दिली आहे. परंतु आता आपल्याजवळ या बस थांब्याबाबत तक्रारी येत आहे. त्यामुळे पदपथांवर तसंच रस्त्यांना कोठेही अडथळा निर्माण न होता या थांब्यांची उभारणी झाले असेल तर ठिक. अन्यथा नियम डावलून बांधकाम झालं असेल, तर त्या थांब्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नियमात राहून परवानगी दिली असेल, तर नियमात राहून त्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे. चुकीच्या पद्धतीने हे थांबे उभारून पदपथ आणि रस्ते अडवले असतील, तर निश्चितच त्यावर कारवाई होईल, असंही उबाळे यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदी: दंड कमी करणं आता सत्ताधाऱ्यांच्या हाती!

वर्सोवा चौपाटीवरील ४० झोपड्या तोडल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा