Advertisement

वर्सोवा चौपाटीवरील ४० झोपड्या तोडल्या


वर्सोवा चौपाटीवरील ४० झोपड्या तोडल्या
SHARES

 वर्सोवा समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ४० कच्च्या झोपड्यांवर मंगळवारी महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी सिलेंडरसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं. 


सिलिंडर्स, ड्रम जप्त

वर्सेावा समुद्र किनाऱ्याजवळील  'सागर कुटीर' जवळ ४० अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या कच्च्या बांधकामाच्या झोपड्या राहण्यासाठी बांधण्यात अाल्या होत्या.  या अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली. या सर्व ४० झोपड्या पाडून टाकण्यात आल्या आहेत. यावेळी ६ सिलिंडर्स, २० ड्रम, भांडीकुंडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. 


पोलिसांची मदत

परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कारवाईत २० पोलिसांचा ताफा आणि १ जेसीबी,१ डंपर, २ लॉरी व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली.  तसेच महापालिकेचे ३० कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते, असेही सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड सांगितले.



हेही वाचा -

मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये प्रवेश राज्यस्तरीय कोट्यानुसार

झाडांच्या छाटणीची परस्पर परवानगी दिलीच कशी?- उच्च न्यायालय


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा