Advertisement

बोरिवली, दहिसरकरांसाठी आणखी ९ क्रीडांगणे


बोरिवली, दहिसरकरांसाठी आणखी ९ क्रीडांगणे
SHARES

मुंबईत प्रारूप विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून उद्यान, क्रीडांगणांचे आरक्षित भूखंड विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात आले आहेत. उद्यान आणि क्रीडांगणाच्या ४१ भूखंडांचा विकास करण्यात येणार असून यामध्ये बोरिवली आणि दहिसरमध्येच ९ क्रीडांगणे तयार होणार आहेत. मात्र, या उद्यान व क्रीडांगणासाठी घाईघाईत डिझाईन बनवून निविदा काढण्यात आल्यामुळे या सर्व विकासकामांचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


४१ भूखंडांवरील उद्याने, क्रीडांगणांचा विकास

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४१ भूखंडांवर नवी उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे भविष्यात मुंबईकरांना २५ नवी उद्याने, मनोरंजन मैदाने व १६ क्रीडांगणे उपलब्ध होऊ शकणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. 

सुमारे २१ लाख ८० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक एकूण आकारमान असणाऱ्या वेगवेगळ्या ४१ भूखंडांच्या विकासासाठी एकूण ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात असल्याची माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे. आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात असून त्या मोकळ्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मंजूर असलेली आरक्षणे विकसित

सध्या महापालिकेची १ हजार ४२ उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे आहेत. यातील ३०५ भूखंडांवर क्रीडांगणे, तर उर्वरित ७३७ भूखंडांवर उद्याने, मनोरंजन मैदाने आहेत. मात्र नव्या विकास आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेली संबंधित आरक्षणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईकरांना २५ नवी उद्याने व खेळण्यासाठी १६ क्रीडांगणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील उद्यानांची एकूण संख्या ७६२, तर क्रिडांगणांची संख्या ३२१ एवढी होणार असल्याची माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.



हेही वाचा -

मैदान असूनही खेळता येईना!

भूमिगत वाहनतळासाठी सल्लागाराची निवड



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा