Advertisement

भूमिगत वाहनतळासाठी सल्लागाराची निवड


भूमिगत वाहनतळासाठी सल्लागाराची निवड
SHARES

मुंबईतील वाढत्या वाहनांमुळे वाहनतळांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून यावर उपाय म्हणून आता भूमिगत वाहनतळे बांधण्यात येत आहेत. भायखळ्यातील झुला मैदान, तसेच वांद्रे पश्चिम येथील रावसाहेब पटवर्धन उद्यान आदी दोन ठिकाणी वाहनतळ बनवण्यात येणार आहे. वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरणाचे कामही हाती घेण्यात येणार असून यासाठी हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


भायखळ्यात भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या भायखळा येथील झुला मैदानाखाली भूमिगत वाहनतळ बनवण्याची मागणी करत सपाचे गटनेते रईस शेख यांनी ही संकल्पना मांडली होती. वांद्रे पश्चिम येथील लिंक रोडवर नॅशनल कॉलेजजवळील रावसाहेब पटवर्धन उद्यानाखालीही भूमिगत वाहनतळ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेने यासाठी अनुभवी वास्तूशास्त्रज्ञांकडून आराखडे मागवले होते. त्यामध्ये १५ संस्थांनी भाग घेतला होता. यातील ३ संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे १२ संस्थांमधून आर्किटेक्ट हाफीज काॅन्ट्रॅक्टर ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आली. त्यामुळे या कंपनीची दोन्ही भूमिगत वाहनतळांच्या बांधकामांसाठी वास्तुशास्त्रीय कामांसाठी सल्लागार म्हणून नेमणूक केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. वांद्रे पश्चिम भागातील वाहनतळासाठी हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे एच-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.


वांद्रे किल्ल्याच्या परिसराचे सुशोभिकरण

वांद्रे पश्चिम भागातील वांद्रे किल्ल्याच्या परिसराच्या सुशोभिरकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठीही आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सुशोभिकरणाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी निर्माण केली जाणार असल्याचे एच-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले.


महापालिकेचे सल्लागार पॅनेल

भूमिगत वाहनतळ आणि वांद्रे किल्ल्याच्या परिसराच्या सुशोभिरकरणाच्या माध्यमातून वास्तुशास्त्रीय सल्लागारांकडून मागवलेल्या आराखड्यांमध्ये पात्र ठरलेल्या वास्तुशास्त्रज्ञांपैकी ५ वास्तूशास्त्रज्ञांची सल्लागार म्हणून पॅनलवर नेमणूक करण्यात येणार आहे.


  1. आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर
  2. रतन जे. बाटलाबॉय कन्सल्टंट
  3. कोलाज डिझाईन
  4. दीपक मेहता आर्किटेक्ट
  5. कोबोल ए. अॅण्ड पी. शलाका आर्किटेक्ट

आता स्थायी समितीच्या मंजुरीनंतर यांचे एक पॅनेल बनवले जाणार असल्याचे महापालिकेच्या वास्तुशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.


भूमिगत वाहनतळ आणि किल्ल्याच्या सुशोभिकरणाचा खर्च

भायखळा झुला मैदान : ५७.३५ कोटी रुपये
वांद्रे रावसाहेब पटवर्धन मैदान : ८८ कोटी रुपये
वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण : सुमारे १९ कोटी रुपये



हेही वाचा - 

वाढत्या पार्किंगवर भूमिगत वाहनतळाचा उतारा?

महिला बचत गटांना वाहनतळांचे कंत्राट - निविदांसाठी २ ऑगस्टची अंतिम तारीख


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा