Advertisement

मुंबईकरांनो, घरातील प्लास्टिक बाहेर फेकायची करा तयारी!

प्लास्टिक बंदी राबवल्यास घरात असलेल्या प्लास्टिकचे काय करावं? असा प्रश्न नागरिकांना भेडसावू शकतो, हे लक्षात घेऊन प्लास्टिक जमा करण्यासाठी मंडया, सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात संकलन पिशव्या तथा पेट्या (कलेक्शन बिन्स) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांनो, घरातील प्लास्टिक बाहेर फेकायची करा तयारी!
SHARES

मुंबईत प्लास्टिक बंदी करण्यात येत असल्याने घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या २४ विभागांमध्ये प्रत्येकी एक तसंच महापालिकेच्या सर्व मंडयां (मार्केट)मध्ये प्लास्टिक संकलन पेट्या ठेवण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात या सर्व प्लास्टिक कचरा संकलन पिशव्या तथा पेट्या ठिकठिकाणी ठेवण्यात येतील. त्यामुळे घरात असलेल्या प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या वस्तू बाहेर फेकायची तयारी मुंबईकरांनी करावी लाणार आहे.


जनजागृती करणार

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर महापालिका स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिक वस्तू न वापरण्याचं आवाहन करत जनजागृती केली जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी राबवल्यास घरात असलेल्या प्लास्टिकचे काय करावं? असा प्रश्न नागरिकांना भेडसावू शकतो, हे लक्षात घेऊन प्लास्टिक जमा करण्यासाठी मंडया, सार्वजनिक ठिकाणे आदी परिसरात संकलन पिशव्या तथा पेट्या (कलेक्शन बिन्स) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


यादी अंतिम

या बिन्स कुठे ठेवाव्यात याची यादी बनवण्यात आली आहे. सद्यस्थितीत २४ विभाग कार्यालयांमध्ये या बिन्स ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबईत एकूण ९२ मंडया आहेत. या सर्व मंडयांमध्येही अशाप्रकारच्या प्लास्टिक संकलन बिन्स ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची यादी अंतिम करण्यात आली आहे. याशिवाय या प्लास्टिक संकलन पिशव्यांसाठी बोधचिन्ह बनवण्यात येत आहे. हे बोधचिन्हालाही अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांच्या मंजुरीनंतर या सर्व ठिकाणी प्लास्टिक संकलन बिन्स ठेवण्यात येणार असल्याचे उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


कापडी पिशव्या

प्लास्टिक वापराबद्दल जनतेमध्ये सर्वप्रथम जनजागृती मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यादृष्टीकोनातून कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे या जनजागृतीबरोबरच नागरिकांना प्लास्टिक ऐवजी कापडी तसेच कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उत्पादक आणि पुरवठादार या सर्वांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत असल्याचंही निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीचा दिव्याखाली अंधार.!

दादरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा