Advertisement

राणीबागेतील ‘त्या’ पडीक बंगल्याचं होणार नूतनीकरण

प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांसाठी असलेल्या तिसऱ्या निवासस्थानाचा मागील अनेक वर्षांपासून वापर होत नसल्याने ते पडून आहे. त्यामुळे १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करून या निवासस्थानाची डागडुजी महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे.

राणीबागेतील ‘त्या’ पडीक बंगल्याचं होणार नूतनीकरण
SHARES

राणीबागेतील प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांसाठी असलेलं निवासस्थान मागील अनेक वर्षांपासून पडून आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या या निवासस्थानाचं नूतनीकरण करून त्यांला मूळस्वरुप देण्याचं काम महापालिका हाती घेत आहे. हे निवासस्थान १०० वर्षांहून अधिक जुनं असून त्याचं नूतनीकरण करून राणीबागेच्या सौंदर्यात भर घातली जाणार आहे.


उद्यानात ३ निवासस्थान

वीर जिजामाता उद्यानात सध्या ३ निवासस्थान असून त्यातील एका निवासस्थानाचं नूतनीकरण महापौरांच्या निवासस्थानासाठी करण्यात आलं आहे. परंतु हे निवासस्थान स्वीकारण्यास महापौरांनी नकार दर्शवल्यामुळे अखेर हे निवासस्थान अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं आहे.


निवासस्थानाची डागडुजी

तर दुसरं निवासस्थान राणीबागेतील अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांसाठी असलेल्या तिसऱ्या निवासस्थानाचा मागील अनेक वर्षांपासून वापर होत नसल्याने ते पडून आहे. त्यामुळे १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करून या निवासस्थानाची डागडुजी महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे.


सौंदर्यात भर

सागवानी लाकडापासून बनवलेला हा एकमजली बंगला आहे. मंगलोरी कौलारू सागवानी लाकडाची संरचना असलेल्या या बंगल्यामुळे वीर जिजामाता उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु अनेक वर्षांपासून या बंगल्यात कुणीच रहात नसल्याने हा बंगला मोडकळीस आला आहे. त्यामुळे या बंगल्याची दुरुस्ती करून त्याचं पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी स्पष्ट केलं.

या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई संस्कृती वारसा जतन समितीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' प्राप्त झाल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

राणीबागेच्या विस्ताराला स्थगितीचा अडसर?

राणीबागेत येणार गुजरातच्या सिंहाचं राज!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा