Advertisement

राणीबागेत येणार गुजरातच्या सिंहाचं राज!

गुजरातमधील जुनाबाग आणि साकरबाग या दोन प्राणी संग्रहालयातील अतिरिक्त सिंह मुंबईत दाखल होणार आहेत. राणीबागेतील पिंजऱ्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना आणण्यात येईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांने स्पष्ट केलं.

राणीबागेत येणार गुजरातच्या सिंहाचं राज!
SHARES

देशातील राजकारणात सध्या गुजरातला अनन्यसाधारण वलय प्राप्त झालेलं असताना, भायखळ्यातील वीर जीजामाता भोसले उद्यान अर्थात राणीबागेतही गुजरातहून येणाऱ्या खास पाहुण्याविषयी कुजबूज ऐकायला मिळत आहे. कारण का पाहुणा थोड्याच दिवसांत इथं स्थिरावणार असून पुढं राणीबागेत त्याचंच राज्य चालणार आहे. हा पाहुणा आहे जंगलचा राजा अर्थात सिंह.

गुजरातमधील जुनाबाग आणि साकरबाग या दोन प्राणी संग्रहालयातील अतिरिक्त सिंह मुंबईत दाखल होणार आहेत. राणीबागेतील पिंजऱ्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना आणण्यात येईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांने स्पष्ट केलं.


६९ कोटींचं कंत्राट

राणीबागेतील दर्शनी भागासह वाघ, सिंह, सांबर, हरिण, नील गाय, चार शिंगी हरिण, काळवीट, भेकरा, पक्ष्यांचा पिंजरा इ. बांधकामासाठी 'स्काय वे' या कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीला आल्यामुळे पिंजऱ्याचं बांधकाम कसं करण्यात येईल? याचं सादरीकरण करण्यात आलं.



सद्यस्थिती काय?

राणीबागेत सद्यस्थितीत वाघ आणि सिंहासह ९ प्राण्यांचे तसंच पक्ष्यांचे पिंजरे बांधण्यात येत असले, तरी वाघ आणि सिंह हे प्राणी राणीबागेत नाहीत. त्यामुळे या प्राण्यांना राणीबागेत कुठून आणणार? असा असा प्रश्न भाजपाचे मनोज कोटक, विरोधी पक्षनेते रवी राजा आणि काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी केला.


पिंजरे पूर्ण झाल्यावरच...

यावर उत्तर देताना राणीबाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. अनिल त्रिपाठी यांनी राणीबागेतील पिंजऱ्यांचं बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय कोणताही नवीन प्राणी इथं आणता येणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळे पिंजऱ्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार इतर राज्यातील प्राणी संग्रहालयामधील प्राणी इथं आणता येतील, असं सांगितलं.


कुठून येणार?

सध्या कानपूर, चेन्नई आणि औरंगाबाद येथील प्राणी संग्रहालयात वाघ उपलब्ध आहेत. गुजरातमधील साकरबाग आणि जुनाबाग प्राणी संग्रहायात अतिरिक्त सिंह आहेत. तर भोपाळमधील प्राणी संग्रहालयातून बारशिंग आणण्याचा विचार आहे.

याबाबतची सर्व तांत्रिक माहिती दिल्यानंतर पिंजऱ्यांच्या कामाच्या प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मंजुरी दिली.



हेही वाचा-

राणीबागेच्या विस्तारीत प्राणीसंग्रहालयाला ‘मफतलाल’चा खोडा

राणीबागेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा