Advertisement

जलवाहिनीलगतच्या बेकायदा झोपड्या वर्षभरात हटवणार


जलवाहिनीलगतच्या बेकायदा झोपड्या वर्षभरात हटवणार
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीलगतच्या सर्व बेकायदेशीर झोपड्या 30 जून 2018 पर्यंत हटवणार असल्याची ग्वाही मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिली आहे.


कारवाईचा दुसरा टप्पा पूर्ण

सध्या या कारवाईचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत चौथ्या टप्यातील कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभा कंकनवाडी यांच्या खंडपीठाने दिले आहेत.


गृहनिर्माणमंत्र्यांकडून कारवाई रोखण्यासाठी दबाव?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांकडून घाटकोपर येथील तानसा जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवरील पालिकेची कारवाई थांबवल्याचा आरोप केला गेला आहे. घाटकोपर विभागातील तानसा तलावातून मुंबईत येणाऱ्या जलवाहिनी नजीकच्या झोपड्यांवरील कारवाई रोखण्यासाठी प्रकाश मेहतांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात जाऊन दबाव टाकल्याचा आरोप महापालिका अभियंत्याने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केला. यासंदर्भात राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. यावर 6 जुलैला सुनावणी होणार आहे.

जनहित मंचतर्फे भगवानजी रयानी यांनी यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांकडून येणाऱ्या जलवाहिनीची सुरक्षा अगदीच वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.


हे देखील वाचा - तानसा जलवाहिनीच्या मोकळ्या जागेत जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा