धोकादायक ठरलेल्या ७ पुलांची लवकरच होणार पुनर्बांधणी

धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर उजाडला आहे.

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पादचारी पूलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पूलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार काही पूल धोकादायक असून, काही पूलांची किरकोळ दुरूस्ती करण्यात येणार होती. यामधील धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर उजाडला आहे.

७ वाहतूक पूल

सांताक्रूझ एसएनडीटी कॉलेज येथील जुहूतारा पूल, मालाड डी मार्ट पूल, दहिसर नदी पूल यासह ७ वाहतूक पूल नव्यानं बांधण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. या पुलांसाठी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार असून या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच हे पूल पाडून नव्या पुलांचं काम हाती घेणार असल्याचं पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पाडकाम तातडीनं हाती

या पुलांची तात्पुरती दुरुस्ती करणं शक्य नसल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटरनं स्पष्ट केल्यानं हे पूल पाडून ते पुन्हा नव्यानं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलांचं पाडकाम तातडीनं हाती घेऊन ऑक्टोबरपासून नव्या पुलांच्या बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. हे पूल ६ महिन्यात बांधण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत पूल न बांधल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे.


नव्यानं बांधण्यात येणारे पूल
खर्च
जुहूतारा पूलजुहू१५ कोटी ३४ लाख
हंसभुग्रा पूलसांताक्रुझ५ कोटी ३० लाख
धोबीघाट मजास पूलजोगेश्वरी६ कोटी ९८ लाख
मेघवाडी पूलजोगेश्वरी४ कोटी ३८ लाख
पिरामल पूलगोरेगाव२६ कोटी २६ लाख
डी मार्ट पूलमालाड२२ कोटी ९० लाख
दहिसर नदी पूलबोरीवली१४ कोटी २३ लाखहेही वाचा -

डॉ. पल्लवी सापळे 'जेजे'च्या अधिष्ठाता पदी नियुक्ती

पार्किंगची सुविधा असलेल्या वाहनतळांपैकी १४ वाहनतळांचा कमी वापरसंबंधित विषय
ताज्या बातम्या