डॉ. पल्लवी सापळे 'जेजे'च्या अधिष्ठाता पदी

मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SHARE

मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉपल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेडॉपल्लवी सापळे या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी कार्यरत आहे. याआधी जेजेरुग्णालायचे अधिष्ठाता डॉअजय चंदनवाले होते. मात्र त्यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. 

अधिष्ठातापदावर नियुक्ती

डॉअजय चंदनवाले यांची त्यांच्या पूर्वीच्या बी. जै. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी अधिष्ठातापदावर असलेल्या डॉ. सुधीर नणंदकर यांना मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, डॉ. सापळे यांच्या जागी पदभार सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


वैद्यकीय प्रशिक्षण


डॉपल्लवी सापळे या जेजे रुग्णालयाच्या विद्यार्थिनी आहेत तसेच त्यांनी वैद्यकीय प्रशिक्षण घेतल्यानंतर कामा आणि जेजे रुग्णालयामध्ये रुग्णसेवाही दिली आहेकामा व जेजे या दोन्ही रुग्णालयामध्ये बालरोग विभागप्रमुखप्राध्यापक अशी जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहेमागील ३ वर्षे त्या मिरज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळत आहेत.हेही वाचा -

रल्वेप्रमाणं एसटी महामंडळही प्रवाशांना पुरवणार पाण्याची सुविधा


संबंधित विषय
ताज्या बातम्या