Advertisement

'स्पेशल टास्क फोर्स' घेणार डासांच्या अड्ड्यांचा शोध

स्वयंसेवी संस्थांमार्फत ३६८ कामगारांची मदत घेऊन डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या नष्ट केल्या जातील. या कामगारांच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत यांची मदत घेतली जाणार आहे.

'स्पेशल टास्क फोर्स' घेणार डासांच्या अड्ड्यांचा शोध
SHARES

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना राबवते. शिवाय डास प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणीचा भाग म्हणून सोसायटी आणि घराघरांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्यांचा शोध घेतला जातो. यासाठी यंदा खासगी स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओची मदत घेतली जाणार आहे. पालिकेने या एनजीओच्या माध्यमातून ३६८ कामगारांची मदत घेतली आहे. या कामगारांची स्पेशल टास्क फोर्स तयार करून डासांचे अड्डे नष्ट केले जाणार आहे.


 उपाययोजना सुरू

मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाकडून सध्या गाड्यांचं टायर, नारळ, प्लास्टिक बॉटल्स, करवंट्या नष्ट केल्या जात आहेत. शिवाय अनेक छपरांवर पाणी साचण्याची शक्यता असेल, तर त्या भागात पाण्याचा निचरा व्यवस्थित केला जावा याबाबत सूचना केली जात आहे.


३६८ कामगारांची घेतली मदत

महापालिकेचे किटक नाशक अधिकारी राजन नारिंगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवी संस्थांमार्फत ३६८ कामगारांची मदत घेऊन डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या नष्ट केल्या जातील. या कामगारांच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत यांची मदत घेतली जाणार आहे. यासर्वांना किमान वेतन याप्रमाणे प्रतिदिन ५७६ रुपये याप्रमाणे वेतन दिलं जाणार आहे. यासर्वांची स्पेशल टास्क फोर्स बनवून युद्धपातळीवर अशाप्रकारचे डासांचे अड्डे नष्ट केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील वर्षी जिथे जिथे डासांचे अड्डे तयार झाले होते, अशा ठिकाणच्या अड्ड्यांवर ही टास्क फोर्स विशेष लक्ष देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


इथे घातल्या धाडी

सांताक्रूझ पश्चिम खारदांडा
लोअर परळ, वडाची चाळ, सत्यकी नगर, हनुमान गल्ली, नेहरू नगर, एस. एन. पथ
ग्रॅंटरोड तुळसीवाडी
परळ, अहमद सेलर पदपथ
गोवंडी, गौतम नगर
जे. जे. हॉस्पिटल कम्पोउंड
बोरीवली पूर्व, काजूपाडा, देवीपाडा
बोरिवली पश्चिम, शिवाजी नगर, शिंपोली रोड


वकिलांचीही फौज तयार

मुंबई मान्सूनपूर्व सर्वांना कल्पना देऊन डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या जातात. त्यानंतर पावसाळ्यात यासर्वांची पाहणी करून जिथे जिथे डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्या सापडून येतात, त्याठिकाणच्या सोसायटी, कंपनी किंवा संस्था आणि मालकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राखण्यासाठी महापालिका नोटीस जारी करते.

डेंग्यू किंवा मलेरियाच्या अळ्या सापडल्यास मुंबई महापालिकेचं आरोग्य विभाग सोसायटी आणि नागरिकांना नोटीस जारी करते. परंतु अनेक प्रकरणामध्ये हा दंड न भरल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरला जातो. पण ही न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे निकाल प्रलंबित राहून केसेस वाढतात. त्यामुळे ही प्रकरणं निकालात काढण्यासाठी आता महापालिका 100 खासगी वकिलांची मदत घेणार आहे. यामध्ये जो वकील केस जिंकेल त्याला महापालिका प्रोत्साहनपर अधिक बक्षिस देणार आहे.


हेही वाचा -

पावसाळ्यात मलेरियासाठी 'हे' भाग पालिकेच्या रडारवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा