Advertisement

घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई महापालिकामार्फत (BMC) मुंबईतील कचरा (Garbage) कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
SHARES

मुंबई महापालिकामार्फत (BMC) मुंबईतील कचरा (Garbage) कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करणं, ओल्या कचऱ्यावर इमारतीच्या आवारातच प्रक्रिया करणं असे उपक्रम महापालिका राबवत आहे. परंतु, घराघरांतून जमा होणाऱ्या घातक सुक्या कचऱ्याची (Deadly dry waste) विल्हेवाट लावणं एक मोठं आव्हान ठरत आहे. त्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology) विकसित करण्यात येणार आहे. 

'प्लाज्मा' (Plazma) या अत्याधुनिक पद्धतीनं कचरा विलगीकरण, विघटन (Waste separation, dissolution) आणि प्रक्रिया वेगानं होणार आहे. याद्वारे दररोज ४ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. मुंबईतून दररोज सुमारे ६ हजार ८०० मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होत आहे. यापैकी सुमारे ५ मेट्रिक टन कचऱ्यावर कांजूरमार्ग इथं शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात येते. तर देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ (Deonar dumping ground) सुमारे १८०० मेट्रिक टन इतक्या कचऱ्याची पारंपरिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात येत आहे.

प्लास्टीक कचऱ्याची विल्हेवाट पुन:प्रक्रियेतून लावण्यात येते. तरीही काही प्रमाणात ओला आणि सुका कचरा एकत्रच जमा होतो. यामध्ये जमा होणाऱ्या ओल्या आणि सॅनिटरी पॅडसारखा घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. त्यामुळं महापालिकेनं कचरा प्रक्रियेसाठी ‘प्लाज्मा’ तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरामध्ये ही यंत्रणा उभारली जाणार आहे. प्लाज्मा तंत्रज्ञानानं कचरा विल्हेवाटीसाठी ६ कोटी ८६ लाख ९० हजार १६० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये ठेकेदाराला मुंबई आणि दोन्ही उपनगरांत प्रत्येकी एक ‘प्लाज्मा’ यंत्रणा उभारून काम करावं लागणार आहे. या कामाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.


हेही वाचा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा