Advertisement

'म्हणून' पालिका कर्मचाऱ्यांनी दिवाळीत मागितला दुप्पट बोनस

मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघटना 'बीएमसी एम्प्लॉईज युनियन’च्या कर्मचार्‍यांनी दुप्पट बोनसची मागणी केली आहेे.

'म्हणून' पालिका कर्मचाऱ्यांनी दिवाळीत मागितला दुप्पट बोनस
SHARES

मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघटना 'बीएमसी एम्प्लॉईज युनियन’च्या कर्मचार्‍यांनी दुप्पट बोनसची मागणी केली आहेे. कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या कामासाठी संघटना कर्मचारी दुप्पट बोनस मागत आहेत. 

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इकबालसिंग चहल यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात युनियन नेते प्रकाश देवदास म्हणाले की, अधिका्यांनी यावर्षी उत्कृष्ट काम केलं असल्यानं त्यांना यावर्षी दिवाळीत डबल बोनस मिळालाच पाहिजे.

पत्राबाबत विचारले असता चहल म्हणाले, “यंदा पालिकेच्या महसुलात ४० टक्क्यांची घट झाली आहे,” युनियनच्या मागण्यांसंदर्भात अद्याप त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पालिका म्युनसिपल इंजिनिअर्स असोसिएशननं नुकत्याच झालेल्या अधिवेशन समितीच्या बैठकीत या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. “आम्हाला हे समजले आहे की पालिका इतर सरकारी संस्थांप्रमाणेच आर्थिक संकाटातून जात आहे. मासिक पगारही देणं अवघड आहे. आम्ही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे, असं असोसिएशनचे अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायदा प्रभावीपणे राबवला जात आहे. अशा परिस्थितीत आंदोलनं करण्यास उद्युक्त करणार्‍यांना कठोर कारवाईला सामोरे जावं लागू शकते.

कोरोनाव्हायरसमुळे सर्व देशभर गेले काही महिने कडक लॉकडाऊन लागू होता. लॉकडाउननं महानगरपालिकेची स्थिती चांगली नाही. महसूल घसरला आहे. अशात कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल की नाही हे सांगता येणं कठिण आहे.  



हेही वाचा

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती मिळणार एका कॉलवर

मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या घटली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा